शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

चिमुकली ! पण, तिच्या नृत्याचा थरार सर्वांना करतो अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 19:45 IST

अवघ्या ५ वर्षाच्या इशिताने एका प्रतिष्ठित चॅनलच्या राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांची मने जिंकली. शहरात ती लिटील डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देइशिताची राष्ट्रीय स्तरावर भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आजच्या पिढीतील लहान मुलांची आकलन क्षमता प्रचंड वाढली आहे. बालपणापासूनच मुले मोठमोठे स्टेज शो गाजवित आहे. या लहानग्या कलावंतांच्या यादीत नागपूरच्या इशिताचाही समावेश व्हायला लागला आहे. अवघ्या ५ वर्षाच्या इशिताने एका प्रतिष्ठित चॅनलच्या राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांची मने जिंकली. शहरात ती लिटील डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे. 

बेसा रोडवरील शाहूनगर येथे राहणारी इशिता महेंद्र बरवड प्रेरणा कॉन्व्हेंटची केजीची विद्यार्थिनी आहे. पण या पोरीला नृत्याचे भलतेच वेड आहे. तिला धड बोलताही येत नव्हते, या वयात ती थिरकायला लागली होती. टीव्हीवरील नृत्याचे शो बघून, स्वत:च त्याचा सराव ती घरात करायला लागली. पोरीची नृत्यातील आवड बघून, आईवडिलांनी तिला प्रोत्साहित केले. नृत्य प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळवून दिले. त्यामुळे तिचे नृत्य आणखी बहरले. नृत्याच्या कॉन्टेम्पररी स्टाईलमध्ये आज ती बेधडक स्टेज शो गाजविते. नागपुरात झालेल्या कीड्स फेस्टिव्हलमध्ये तिने उत्कृष्ट सादरीकरण केले. सेंट्रल इंडिया डान्स चॅम्पियनशीमध्ये तिने चांगलाच प्रभाव पाडला. राज्यस्तरावरील डान्स स्पर्धेत तिच्या नृत्याने परीक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मोठमोठ्यांना लाजवेल असा तिच्या नृत्याचा थरार आहे. २६ आॅगस्ट रोजी न्यू इंडिया डान्स फेडरेशनच्यावतीने वर्धेत झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत तिने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. स्थानिक, विभागीय, राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अवघ्या ५ वर्षाच्या पोरीने आपल्या टॅलेंटने पटकाविलेले पारितोषिक वाखाणण्याजोगे आहे.आता एका प्रतिष्ठित चॅनलच्या इंडिया टॅलेंट फाईट शोच्या सेमीफायनलसाठी तिची निवड झाली. उत्तराखंड येथील रुडकी येथे संपन्न झालेल्या सेमी फायनल राऊंडमध्ये तिने परीक्षकांना चांगलेच आश्चर्यचकित केले. तिचा परफॉरमन्समुळे स्पर्धेच्या टॉपटेनमध्ये नक्कीच निवड होईल, अशी अपेक्षा इशिताची आई सुचिता बरवड यांना आहे.नृत्याप्रति तिची आवड, अवघड स्टेप्स करून घेण्याची तिची जिज्ञासा, स्टेजवरील तिचे डेअरींग इतक्या कमी वयात मुलींमध्ये असणे, तिच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले संकेत आहे. तिच्या आजपर्यंतच्या झालेल्या परफॉरमन्सवरून इशिता नक्कीच नागपूरचे नाव चमकवेल.अक्षय चौधरी, कोरिओग्राफर

टॅग्स :danceनृत्यnagpurनागपूर