शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: July 20, 2015 03:04 IST

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे. सुमित बागडे (३०), अशोक खोब्रागडे (३५) व १६ वर्षीय मुलगा अशी आरोपीची नावे आहेत. गेल्या सात दिवसात या प्रकारची ही सहावी घटना आहे. यात चार अल्पवयीन विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत पसरलेली आहे. इमामवाडा पोलीस ठाणे अंतर्गत राहणारी पीडित १२ वर्षीय विद्यार्थिनी सातव्या वर्गात शिकते. वस्तीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलासोबत तिची मैत्री आहे. तो मुलगा नवव्या वर्गात शिकतो. शुक्रवारी रात्री मुलाने तिला भेटायला बोलाविले. सूत्रांनुसार मुलगी जेव्हा मुलाला भेटायला आली तेव्हा त्याने तिला दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता यायला सांगितले. शनिवारी रात्री १२ वाजता मुलगी त्याला भेटायला आली तेव्हा मुलाच्या घरी भाड्याने राहणारा सुमित आणि त्याचा मित्र अशोक खोब्रागडे होता. सुमित व अशोक हे आॅटो चालक आहेत. त्यांनी मुलीला फिरायला चलण्याचे आमिष दाखविले. मुलगीही तयार झाली. ते तिघेही मुलीला आॅटोने जरीपटक्यातील समतानगरात घेऊन गेले. तिथे एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. पहाटे ५.३० वाजता तिला वस्तीत सोडून फरार झाले. रविवारी सकाळी मुलीची अवस्था पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली तेव्हा खरा प्रकार समोर आला. नातलग तिला घेऊन इमामवाडा पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध बलात्कार, अपहरण आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आदी गुन्हे दाखल केले. सुमित बागडे आणि आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)