शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी कृषी मंत्रालय दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:59 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भातील शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शासनावर टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देशरद पवारांचा आरोप : कर्जमाफीची नियोजनशून्य अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भातील शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शासनावर टीकास्त्र सोडले आहे. प्रशासकीय परवानगीशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊच शकत नाही. या प्रकरणात कृषी मंत्रालयच दोषी असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.अमरावती येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शरद पवार सोमवारी सकाळच्या सुमारास नागपूर विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कीटकनाशक नियंत्रणासाठी कायदा आहे व वापरासाठी स्वतंत्र संशोधन संस्थादेखील आहे. संस्थेच्या मान्यतेशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊ शकत नाही. आम्ही आमच्या कार्यकाळात नियमांचे काटेकोरपणे पालन केले. गेल्या तीन वर्षात काय झाले माहीत नाही. या प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. आमच्या काळात जे नियमांचे उल्लंघन करून विक्री करायचे, त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई केली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.राज्यात शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र ही कर्जमाफी नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे. कर्ज न घेतलेल्या शेतकºयांना पत्रे आली. सुधारणा करण्यासाठी शासनाला १५ दिवसांचा वेळ देऊ, नाहीतर पुढील दिशा ठरवू, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वादावर काहीच भाष्य करणार नसल्याचे सांगितले.नियमात अडकून न पडता शेतकºयांना मदत करापरतीच्या पावसामुळे विदर्भात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे . केंद्र व राज्य शासनाने नियमात अडकून न पडता शेतकºयांना मदत केली पाहिजे . यासंदर्भात राज्य शासनाशी बोलणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.