आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.रेल्वे मंत्रालयाने स्पॅनिश कंपनीची मुंबई-नागपूर जलदगती रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्ती केली आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र राज्य सरकारला केंद्र शासनाकडून याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, संजय दत्त आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
मुंंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प विचाराधीन असल्याची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:30 IST
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
मुंंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प विचाराधीन असल्याची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती
ठळक मुद्देकेंद्राकडून अद्याप प्रस्तावाबाबत खातरजमा नाही