शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मंत्रिमहोदय, नंबरच बंद आहे, कुठे करायची तक्रार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरचा वीज पुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरचा वीज पुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. अखेर आपण महावितरणच्या वेबसाईटवर जातो. तिथे ठळकपणे दिलेले संपर्क क्रमांक पाहून आपण भलतेच खुश होतो. फोन लावतो, मात्र पलीकडून ऐकायला मिळते, ‘या क्रमांकाची इनकमिंग सेवा बंद करण्यात आली आहे.’ ऐकून आपले अवसान गळते, गप्प बसण्याशिवाय दुसरे असते तरी काय? हा प्रकार आहे महावितरणचा ! आश्चर्य म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशावरूनच हे संपर्क क्रमांक वेबसाईटवर टाकलेले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी महावितरणला हे दोन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. यातील एक लॅन्डलाईनचा क्रमांक (०२२-४१०७८५००) आहे. वीज गेल्यावर मिस कॉल देऊन या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे महावितरणचेच आवाहन आहे. मात्र, त्यावर इनकमिंग कॉल बंद असल्याची माहिती मिळते. याच प्रकारे ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस करण्याचेही आवाहन आहे. मात्र, एमएसएम पाठविल्यावर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. संपर्क सेवाही बंद आहे.

...

बिल न भरल्याने सेवा खंडित

महावितरणचे अधिकारी यासंदर्भात काहीच सांगत नाहीत. मात्र, मोबाईल आणि टेलिफोनचे बिल न भरल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी तर तक्रारकर्त्यांच्या वारंवार येणाऱ्या कॉलचा त्रास वाचविण्यासाठी मुद्दामहून इनकमिंग कॉल बंद करून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार घडत होता.

...

सेवा बंद असतानाही वेबसाईटवर नंबर कशाला?

महावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग) उदय गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा लॉकडाऊनच्या प्रारंभाला दिली होती. फक्त वाणिज्य आणि औद्योगिक सेवा असणाऱ्या ग्राहकांसाठी हे क्रमांक उपलब्ध होते. मात्र, आता ही सेवा बंद आहे.