शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च ८ लाख; शासनाची मदत केवळ दीड लाखांची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत या ...

नागपूर : कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत या आजाराला समाविष्ट केले असून १ लाख ५० हजार, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपये निश्चित केले आहे. परंतु या आजारात विविध विषयांतील विशेषज्ञ, औषधोपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयातील वास्तवाचा खर्चच किमान ८ लाखांवर जात असल्याने शासनाची ही मदत तोकडी पडत आहे. यामुळे जनआरोग्य योजनेत असलेल्या खासगी रुग्णालयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला समोर जावे लागत आहे. मेयो व मेडिकलमध्ये आतापर्यंत १३५ रुग्ण उपचारासाठी आले असून, यातील ५२ रुग्णांवर शस्त्रक्रिया, तर १५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्याच्या स्थितीत या दोन्ही रुग्णालये मिळून १०० रुग्ण उपचाराखाली आहेत. खासगी रुग्णालयात ३००वर रुग्ण असल्याचे सांगितले जाते. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांवर पडू नये यासाठी योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाखांचे दहा दिवसांचे ‘पॅकेज’ दिले आहे. परंतु बहुआयामी विशेषज्ञाची सेवांची पडत असलेली गरज, शस्त्रक्रिया, महागडी औषधी व रुग्णालयातील वास्तव आदींचा खर्चच एका रुग्णाला ८ ते १० लाख रुपये येत असताना दीड लाखात हा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न खासगी रुग्णालयांना पडला आहे. सध्या जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या ३८ खासगी रुग्णालयातून एकाही रुग्णालयात या योजनेतून उपचार सुरू नसल्याची माहिती आहे. यामुळे रुग्णांचा संपूर्ण भार मेयो, मेडिकलवर आला आहे.

- उपचाराचा खर्च मोठा

म्युकरमायकोसिच्या रुग्णांना मायक्रोबायलॉजिस्ट, इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट, इन्टेन्सीव्हीस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट, ऑप्थेल्मोलॉजिस्ट, डेंटिस्ट, मॅक्सीलोफेशिअल किंवा प्लॅस्टिक सर्जन व बायोकेमिस्ट अशा विशेषज्ञांच्या सेवांची गरज पडते. यांच्याशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाय, ‘लिपोसोमल अ‍ॅम्फोटीसिरीन-बी’ ‘५० एमजी’च्या एका इंजेक्शनची किंमत बाजारात ७,५०० रुपयांचे आहे. रुग्णाचा आजाराची गंभीरता पाहून दिवसाला जवळपास दोन ते चार इंजेक्शन दिले जातात. ‘पॉसॅकोनाझोल’ दहा गोळ्यांची किंमत पाच हजारांच्या घरात आहे. या शिवाय, इतरही औषधांचा खर्च आहेच. हा खर्च दीड लाखांत बसत नसल्याचे योजनेतील काही रुग्णालयांचे म्हणणे आहे. सध्यातरी एकाही खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार होत नाही आहे.

- रुग्णांच्या नातेवाइकांची पैशासोबतच औषधांसाठी धावाधाव

सुरुवातील कोरोना आणि आता म्युकरमायकोसिसच्या खासगी रुग्णालयातील उपचारामुळे रुग्णाचे नातेवाईक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एका नातेवाईकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर रुग्ण उपचार घेत आहेत. रोजचा खर्चच जवळपास ५० हजारांवर जात आहे. जीव वाचविण्यासाठी उसनवारीवर पैसे घेतले आहे. यात रुग्णालयातून इंजेक्शन मिळत नसल्याने त्यासाठीही धावाधाव करण्याची वेळ आली आहे.

-म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण : ४३५

-म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू : १५