शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनात रुंजी घालणारा कार्यक्रम ‘गंध प्रीतीचा’

By admin | Updated: May 25, 2016 02:55 IST

प्रेम हीच खरी शाश्वत भावना आहे. जगात मोठमोठ्या क्रांती प्रेमाच्या भरवशावर झाल्यात हा इतिहासही आहे.

राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन : १०० वर्षांतील प्रेमकवितांचे अभिवाचननागपूर : प्रेम हीच खरी शाश्वत भावना आहे. जगात मोठमोठ्या क्रांती प्रेमाच्या भरवशावर झाल्यात हा इतिहासही आहे. त्यामुळेच कदाचित जगातल्या कुठल्याही कवीला, कलावंताला प्रेम ही भावना कधीच टाळता आली नाही. किंबहुना ती टाळता येणे अशक्यच आहे. हळुवार मनात घर करणारी, विरहार्त व्याकुळ करणारी आणि हुरहुर लावणारी, आनंदी करणारी, आयुष्य बदलून टाकणारी आणि आयुष्य व्यापून उरणारी, प्रेमाचे दु:खही हळवे आणि सुखही टचकन डोळ्यात आनंदाश्रु आणणारे. माणूस कितीही पांडित्यपूर्ण आणि प्रगल्भतेचा आव आणणारा असला तरी प्रेम ही भावना त्यात असतेच. प्रेमाचे अनेक पदर असतात, पैलू असतात, अनेक नात्यांमध्ये प्रेमाच्या विविध छटाही असतात. प्रेमाच्या या सर्व पैलूंना स्पर्श करणारा अभिवाचनाचा आणि सुरेलतेचा स्पर्श असणारा कार्यक्रम ‘गंध प्रीतीचा’ रसिकांच्या आठवणीत राहणारा ठरला.राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने राम गणेश गडकरी यांच्या १३१ व्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजीतबाबू देशमुख, गिरीश गांधी, डॉ. अविनाश रोडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची भूमिका शुभदा फडणवीस यांनी सांगितली आणि कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, अनुराधा मराठे आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचे अभिवाचन कवितांना अर्थप्रवाही करणारे होते. बालकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे आणि गोविंदाग्रज म्हणून कविता करणारे गडकरी म्हणजे अजब रसायन. या मनस्वी प्रतिभावंतांच्या गद्य आणि पद्य अभिवाचनाने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या नाटकातील पदे, संवाद आणि कवितांच्या सादरीकरणाने सुरू झालेला हा प्रवास शंभर वर्षांच्या प्रेमकवितेचा धांडोळा घेत मनात रुंजी घालत राहिला. गडकऱ्यांना प्रेमाचे शाहिर असे संबोधन लावले जाते. त्यामुळेच शंभर वर्षातील प्रेमकवितांना स्पर्श करताना केशवसूत, भा. रा. तांबे, उपाध्ये, बालकवी, रॉय किणीकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, पद्मा शेळके, इंदिरा संत, वसंत बापट, शंकर वैद्य, सुरेश भट, दासु वैद्य, सुधीर मोघे, अरुण कोल्हटकर, पु. शी. रेगे, कवी अनिल, अरुणा ढेरे असा हा प्रवास आनंददायी झाला. याप्रसंगी अनुराधा मराठे यांनी काही कविता गेय स्वरुपात सादर करून रसिकांना आनंद दिला. (प्रतिनिधी)