शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात लाखोंचा घोटाळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 10:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. माजी ‘वॉर्डन’ने विद्यार्थ्यांच्या ‘डिपॉझिट’ रकमेची परस्पर उचल केल्याचा ठपका लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देमाजी ‘वॉर्डन’वर ठपका विद्यार्थ्यांच्या ‘डिपॉझिट’ रकमेची परस्पर उचल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. माजी ‘वॉर्डन’ने विद्यार्थ्यांच्या ‘डिपॉझिट’ रकमेची परस्पर उचल केल्याचा ठपका लावण्यात आला आहे. सुमारे चार वर्ष हा प्रकार सुरू होता व या माध्यमातून लाखो रुपयांची उचल झाली असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांकडून ‘मेस डिपॉझिट’च्या नावाखाली प्रत्येकी दोन हजार रुपये घेण्यात येतात. हे शुल्क एका विशिष्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते व त्या खात्यातून पैसे काढण्याचे कुठलेही अधिकार ‘वॉर्डन’कडे नसतात. विद्यापीठाचे माजी ‘वॉर्डन’ डॉ.प्रकाश शेडमाके यांनी या बँक खात्यातून परस्पर खात्याच्या ‘सेल्फ चेक’च्या माध्यमातून ही रक्कम काढली अशा तक्रारी विद्यापीठाला प्राप्त झाल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने यासंदर्भात वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्याशी संपर्क केला असता आर्थिक अनियमिततेची तक्रार विद्यापीठाकडे आली. त्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बँक खात्यात आर्थिक अनियमितताडॉ.शेडमाके यांच्याऐवजी डॉ.शामराव कोरेटी यांना वसतिगृहाच्या ‘वॉर्डन’पदाची जबाबदारी देण्यात आली. सूत्र स्वीकारत असताना डॉ.कोरेटी यांनी बँक खात्याचा तपशील तपासला. यावेळी खात्यात आर्थिक अनियमितता झाल्याची शंका डॉ.कोरेटी यांना आली. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना याची माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात डॉ.कोरेटी यांना विचारणा केली असता अगोदरच्या ‘वॉर्डन’नी नेमके काय केले व त्यांच्याकडून जबाबदारी का काढून घेण्यात आली हे मला माहिती नाही. मी आत्ताच ‘चार्ज’ घेतला आहे. त्यामुळे या विषयावर फार माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

वसतिगृहाच्या वाढीव शुल्कासाठी झाले आंदोलनविद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहतात. नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृह शुल्कात २००० सालापासून एकदाही शुल्कवाढ झाली नव्हती. मागील महिन्यात विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह शुल्कात वाढ केली. यासंदर्भात विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली. अखेर विद्यापीठाला ही वाढ मागे घ्यावी लागली. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या ‘डिपॉझिट’मधला घोटाळा इतके दिवस लक्षात कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ