शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
4
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
5
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
6
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
7
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
8
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
9
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
10
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
11
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
12
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
13
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
14
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
15
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
16
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
17
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
18
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
19
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
20
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील आमदार निवास दुरुस्तीच्या नावावर कोट्यवधींचा गैरव्यवहार; चरण वाघमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 20:13 IST

मुंबईतील मनोरा या आमदार निवासातील आमदारांच्या खोल्या सुसज्जित करण्यासाठी खरेदीच्या नावावर कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी केला.

ठळक मुद्देमोक्का लावा, गुन्हे दाखल कराचरण वाघमारे यांची विधानसभेत मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबईतील मनोरा या आमदार निवासातील आमदारांच्या खोल्या सुसज्जित करण्यासाठी खरेदीच्या नावावर कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी केला. हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला असल्याने अधिकाऱ्यांवर मोका लावून गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी केली.चरण वाघमारे यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘पॉर्इंट आॅफ इन्फॉरमेशन’अंतर्गत हा मुद्दा उपस्थित केला. वाघमारे म्हणाले, माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून आपण या प्रकरणाच्या खोलापर्यंत पोहोचलो. दुकानांमधून कोरे इस्टीमेट तयार करून अधिकाऱ्यांनी अपल्या मनमर्जीने त्यात रक्कम भरली. एक लाखपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी टेंडर काढणे आवश्यक असताना अभियंत्यांनी आमदार निवासासाठी थेट खरेदी केली. हा मोठा गैरव्यवहार आहे. अशा वेळी या प्रकरणात मोकाअंतर्गत कारवाई व्हावी. सरकार ते करीत नसेल तर मला तक्रार करण्याची परवानगी द्यावी. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही हा मुद्दा उपस्थित केला.एका खोलीवर २८ लाखाचा खर्चचरण वाघमारे यांनी सभागृहात सांगितले की, आमदार निवासात ३३० वर्गफुटाची खोली आहे. मुंबईतील दराप्रमाणे एक खोली सुसज्ज करण्यासाठी १५०० रुपये वर्ग फुटाच्या दराप्रमाणे पाच लाख रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. परंतु आमदार निवासातील एका खोलीवर तब्बल २८ लाख रुपयाचा खर्च झालेला आहे. लक्षवेधी राखून ठेवलीकाँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांनी सुद्धा आमदार निवासातील गैरप्रकाराबाबत सभागृहात आवाज उचलला. याच संदर्भात आपण लक्षवेधी सादर केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी ही लक्षवेधी लागू देणार नाही, असे सांगत होते. झालेही तसेच. ही लक्षवेधी शुक्रवारी लागणार होती, परंतु लागली नाही, असे त्यांनी सांगितले.अधीक्षक अभियंत्याकडून चौकशी करण्याचे आदेशसार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अधीक्षक अभियंत्यामार्फत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधीक्षक अभियंत्याकडून ही चौकशी केली जाईल.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७MLA Hostelआमदार निवास