शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा निधी खर्चच नाही

By admin | Updated: April 30, 2017 01:33 IST

शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या उदासीनतेमुळे खर्चच झाला नाही.

सामाजिक न्याय विभागाची उदासीनता : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांमुळे मिळणार ६०९ कोटीनागपूर : शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या उदासीनतेमुळे खर्चच झाला नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.सन २०१७-१८ पासून मिळणारा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वापरण्यात यावा यासाठी पालकमंत्र्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे हा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्यात यावा, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. परिणामी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी तिन्ही योजनांचा यंदा ६०९ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.बिगर आदिवासी योजनेंतर्गत जनतेच्या कल्याणासाठी नियोजन विभागाकडून निधी जिल्ह्याला प्राप्त होतो. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी प्राप्त होत असतो. विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती, दलित वस्त्या व मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून समाज कल्याण विभागाला निधी प्राप्त होत असतो.या तिन्ही योजना नियोजन विभाग, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून नियंत्रित केल्या जातात. या विभागांकडून प्राप्त होणारा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च केल्यास स्थानिक स्तरावरील प्रश्न जिल्ह्यातच सुटतील, या हेतूने १६ फेब्रुवारी २००८ रोजी नियोजन विभागाने एका आदेशान्वये हा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्याचा निर्णय घेतला. तसेच आदिवासी विकास विभागाने १६ डिसेंबर २००९ रोजी शासन निर्णय काढला व त्याचीही अंमलबजावणी केली. शासन निर्णयानुसार आदिवासी विभाग आणि नियोजन विभागाने हा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्याचा निर्णय घेतला. पण सामाजिक न्याय विभागाने मात्र त्यांचा ४ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. परिणामी जिल्ह्याला दरवर्षी मिळणारा सुमारे ९ ते १० कोटी रुपयांचा निधी पूर्णपणे खर्च होऊ शकला नाही. अशीच स्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यातही असल्यामुळे केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे कोट्यवधीचा निधी व्यपगत झाला.(प्रतिनिधी)पालकमंत्री बावनकुळे यांनी वेधले लक्ष ही बाब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षात येताच त्यांनी ४ फेब्रुवारी २०१० च्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सामाजिक न्याय विभाग, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे व १२ आॅगस्ट २०१६ च्या जिल्हा नियोजन समितीत प्रस्ताव पारित करून पाठपुरावा केला. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय विभागाने सन २०१७-१८ या वर्षापासून २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विशेष घटक योजनेचा निधी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे यंदापासून जिल्ह्याला प्राप्त होईल. यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांचाही फायदा होणार आहे. सन २०१७-१८ ला नागपूर जिल्ह्यासाठी तीनही योजना ंमिळून ६०९.८५ कोटींचा निधी मंजूर आहे.