शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळेतील मुली उपाशी

By admin | Updated: September 24, 2015 03:21 IST

राष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या.

रेशन नाही म्हणून भोजन बंद : ९० टक्के मुली परतल्या घरी, अनुदान जाते तरी कुठे?मंगेश व्यवहारे नागपूरराष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या. विदर्भातही दहा वर्षापूर्वी १०० टक्के अनुदान तत्त्वावरील सैनिकी मुलींची निवासी शाळा नागपूरजवळच्या वडधामन्यात सुरू करण्यात आली. मात्र, या शाळेत शिकणाऱ्या मुलींना दोनवेळचे जेवणही मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उपाशीपोटी राहावे लागत असल्याने ९० टक्के मुली घरी परतल्या आहेत. या सैनिकी शाळेला सरकारी अनुदान मिळते. तरीही संस्थाचालक शाळेत रेशनचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे अनुदान जाते तरी कुठे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.समाजकल्याण विभागाची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या या संस्थेला अधिकाऱ्यांचेच तर पाठबळ नसावे ना, असा प्रश्न वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतली जात असल्याने उपस्थित केला जात आहे.महावैष्णवी महिला मंडळाद्वारे संचालित असलेली राणी लक्ष्मीबाई नावाने मुलींची सैनिकी शाळा २००५पासून वडधामना येथे चालविली जात आहे. शाळेच्या शेजारीच मुलींचे वसतिगृह आहे. पाचवी ते दहावीपर्यंत येथे वर्ग आहेत. विदर्भातील ९० मुली येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येक मुलीमागे १५००० रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागाकडून संस्थेला देण्यात येते. या अनुदानातून संस्था मुलींच्या राहण्याची, खाण्याची सोय करते. गेल्या काही महिन्यापासून संस्थाचालकाच्या दुर्लक्षामुळे येथील मुलींचे हाल होत आहेत. नियमानुसार मुलींना दररोज दुध, नाश्ता, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. परंतु येथे नियमित जेवणाचेही वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून वसतिगृहातील रेशन संपले आहे. संस्थाचालकांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. शौेचालयात किचन, स्वयंपाक मुलींकडे शौचालयाच्या ठिकाणी किचन बनविण्यात आले आहे. किचनमध्ये ठेवलेल्या भांड्यामध्ये अन्नाचा दाणासुद्धा आढळला नाही. पिण्यासाठी फिल्टर आहे, मात्र तेही नादुरुस्त. एवढ्या मोठ्या संख्येने मुली असतानाही स्वयंपाकासाठी गॅस नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. दोन्ही स्वयंपाकीला पगार न मिळाल्याने त्या सोडून गेल्यामुळे मुली स्वत: स्वयंपाक करीत आहेत. आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध नाही. विशेष म्हणजे वसतिगृहाचे वीज बिल न भरल्याने वर्षभरापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वसतिगृहात अस्वच्छतेचा कळस आहे.