शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चीनला प्रत्युत्तर देण्यास सैन्य सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:42 IST

चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे सीमेवर तणाव आणखी वाढला आहे.

ठळक मुद्देउत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत : सरसंघचालकांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे सीमेवर तणाव आणखी वाढला आहे. या घुसखोरीबाबत नेमकी अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र या भागाचे चिन्हांकन झालेले नसल्यामुळे असे प्रकार घडत असतात. मात्र चीनने जाणूनबुजून घुसखोरी केली असल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असे स्पष्ट मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. याअगोदर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.चमोली जिल्ह्यातील बाराहोटी हे गाव असून हा भाग अनेक काळापासून वादग्रस्त आहे. या भागाचे अद्याप चिन्हांकन झालेले नाही. भारत व चीन दोन्ही देशांचे सैनिक तेथे शस्त्र घेऊन जात नाहीत. मात्र या भागात दोन्ही देशातील सैनिक जात असतात. या भागात कुणीही राहत नाही. केवळ सैन्य, ‘आयटीबीपी’चे जवान व पोलीस असतात. चीनकडून चिथावणी देणारी भाषा बोलण्यात येत असेल तर आमचे सैन्यदेखील मजबूत आहे. सेनाध्यक्षांनी तर अगोदरच आपली भूमिका स्पष्ट करून कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते, याची आठवणदेखील त्यांनी करून दिली.संघ स्वयंसेवक म्हणून भेटसरसंघचालकांसोबत भेटीबाबत विचारणा केली असता, मी एक संघ स्वयंसेवक असून नागपूर माझी प्रेरणाभूमी आहे. नागपुरात राष्ट्रीय कर्करोग केंद्राला भेट देण्यासाठी आलो होतो. त्यामुळे सरसंघचालकांना स्वयंसेवक म्हणून भेटणार आहे. उत्तराखंडमध्येदेखील टाटा समूहाच्या मदतीने कर्करोग केंद्र निर्माण करत असल्याची माहिती त्यांनी दिली.उत्तराखंडमध्ये एकाही शेतकºयाचे पत्र नाहीउत्तराखंडमध्ये शेतकरी आत्महत्येवर वाद सुरू आहे. यासंदर्भात विचारणा केली असता राज्यातील ९० टक्के लोक शेतकरी आहेत. मात्र आतापर्यंत एकाही शेतकºयाच्या आत्महत्येचे पत्र प्राप्त झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यावरच पुढील भाष्य करता येईल, असे त्यांनी सांगितले.नागपुरातील उद्योजकांशी चर्चारावत यांचे नागपुरात दुपारी १२ च्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर त्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांची भेट घेतली. डिसेंबरमध्ये डेहराडून येथे उद्योजक मेळावा आयोजित केला आहे. त्याचे निमंत्रण नागपुरातील उद्योजकांना दिले, असे रावत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रशासनातील काही अधिकाºयांचीदेखील भेट घेतली.