शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मिका सिंगची म्युझिकल नाईट झालीच नाही : आयोजकांनी हडपले १२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:48 IST

पार्श्वगायक मिका सिंग नाईटच्या आयोजनातून लाखोंचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डेकोरेटर्सला ६ जणांनी १२ लाखांचा गंडा घातला. जरीपटका पोलीस ठाण्यात या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देडेकोरेशनवाल्याची फसवणूक : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पार्श्वगायक मिका सिंग नाईटच्या आयोजनातून लाखोंचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डेकोरेटर्सला ६ जणांनी १२ लाखांचा गंडा घातला. जरीपटका पोलीस ठाण्यात या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. आरोपींमध्ये गायक मिका सिंगची दिल्लीतील कथित व्यवस्थापक सपना मेहता, मुंबईतील इव्हेन्ट मॅनेजर रजनीश बेरी, अभिजीत चौधरी आणि रिदम बॅनर्जी तसेच नागपुरातील इव्हेन्ट आॅर्गनायझर सुमित तिडके आणि अमित तिडके यांचा समावेश आहे.फिर्यादी विजय परशूराम वालदे (वय ४९) हे इंदोरा (बेझनबाग) मधील मॉडेल टाऊन येथे राहतात. त्यांचा डेकोरेशन आणि कॅटरर्सचा व्यवसाय आहे. उपरोक्त आरोपींनी २१ डिसेंबर २०१३ ला वालदे यांना नागपुरात मिका सिंगची म्युझिकल नाईट आयोजित केल्यास लाखोंचा लाभ मिळेल, असे सांगून कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी तयार केले. त्यानंतर सपना, सुमीत आणि अमित या तिघांनी वालदेंकडून कार्यक्रम आयोजनाच्या सहभागासंबंधीचा करारनामा लिहून घेतला. त्याचवेळी वालदेंकडून त्यांनी टप्प्याटप्प्याने १२ लाख रुपये घेतले. डिसेंबर २०१३ मध्ये वालदेंसोबत करारनामा केल्यानंतर आरोपींनी हा कार्यक्रम २०१४ ला करू असे सांगितले होते. नंतर कार्यक्रमाची तारीख वेगवेगळे कारण सांगून पुढे ढकलली. आता त्याला ५ वर्षे झाली. मात्र, आरोपींनी मिकासिंग म्युझिकल नाईट (कार्यक्रम) नागपुरात घेतलीच नाही. आरोपींकडून कार्यक्रम घेतला जाणार नाही, हे लक्षात आल्यामुळे वालदे यांनी त्यांना आपली रक्कम परत मागितली. आरोपींनी रक्कम परत देण्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या परंतू रक्कम परत केली नाही. ते टाळाटाळ करीत असल्याचे आणि आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने वालदे यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शुक्रवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Mika Singhमिका सिंगfraudधोकेबाजी