शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

मिहानचा लूक बदलतोय...

By admin | Updated: December 29, 2016 03:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे

मध्ये दीड हजार जणांना रोजगार, दोन हजार कोटींची गुंतवणूक नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे मिहानमध्ये वर्ष २०१६ मध्ये पतंजली, रिलायन्स एरोस्ट्रक्चर लि., इंडो-युके हेल्थ इन्स्टिट्यूटसह एम्स, आयआयएम आदींसह अनेक उद्योगांची मुहूर्तमेढ झाली आहे. त्यामुळे मिहानला आता खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली आहे. अनेक कंपन्यांचे काम वेगात सुरू आहे. टीसीएस, इन्फोटेक, लुपिन, एअर इंडिया, टाल, एमआरओ या सारख्या कंपन्या कार्यरत आहेत. उद्योगांना लागणाऱ्या साऱ्याच पंचतारांकित सोयीसुविधा आणि वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्ष २०१६ मध्ये देशभरातील कंपन्यांचा ओघ मिहानकडे वळला आहे. मिहानमध्ये एमएडीसीने अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. उद्योगांना लागणाऱ्या सोई उपलब्ध असल्यामुळे येत्या काळात अनेक कंपन्यांमध्ये हजारोंना रोजगार उपलब्ध होण्यासह विदर्भाचा विकास होणार आहे. प्रकल्पाचा विकास व सद्यस्थिती महाराष्ट्र सरकारने ४ जानेवारी २००२ साली मिहान प्रकल्पाला मान्यता दिली आणि त्यासाठी एमएडीसी ही नोडल एजन्सी स्थापन केली. भारत सरकारने जानेवारी २००८ ला महाराष्ट्र सरकारचा मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर कार्गो हब एअरपोर्ट प्रकल्प मंजूर केला. या प्रकल्पाची मूळ कल्पना कार्गो हब अशी आहे. या प्रकल्पाचे दोन भाग असून पहिला कार्गो हब व दुसरा आर्थिक विशेष क्षेत्र. त्यासाठी किमान दोन धावपट्ट्या आवश्यक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खासगीकरणाच्या माध्यमातून अत्याधुनिक करण्यासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या आहेत. विमानतळाशेजारी उत्पादन होणारे विशेष आर्थिक क्षेत्र आहे. मिहान प्रकल्पाचे ठिकाण भोगौलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी आहे. येथून रस्ता, हवाईमार्ग, रेल्वे मार्ग सहज उपलब्ध आहेत. मिहान प्रकल्पाचे प्रमुख दोन भाग आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र आणि नॉन-सेझ. अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय मिहान प्रकल्प ४२०० हेक्टरमध्ये आहे. यातील १,३६० हेक्टर जागा विमानतळासाठी व दोन हजार हेक्टर जागा सेझसाठी आहे. सेझमधील बीपीएस, टाल आणि लुपिन फार्मा यांनी निर्यात सुरू केली आहे. तसेच एअर इंडियाचा एमआरओ सुसज्ज आहे. टीसीएस सुरू झाले आहे. लुपिन फार्मा यांनी २५० कोटी गुंतवणूक केली आहे.