शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

मिहान ठरणार भ्रमण केंद्र!

By admin | Updated: March 31, 2015 02:11 IST

विदेशी वाणिज्यदूत आणि कंपन्यांसाठी मिहान आता भ्रमण केंद्र ठरले आहे. त्यांच्याकडून उद्योग उभारणी शून्य आहे.

नागपूर : विदेशी वाणिज्यदूत आणि कंपन्यांसाठी मिहान आता भ्रमण केंद्र ठरले आहे. त्यांच्याकडून उद्योग उभारणी शून्य आहे. निमंत्रणानंतर एक सोपस्कार म्हणून मिहानचा दौरा करणे आणि अहवाल तयार करून आपल्या सरकारला पाठविणे, हाच नित्यक्रम वाणिज्यदूतांचा झाल्याचे गेल्या पाच वर्षांत मिहानच्या पाहणी दौऱ्यावरून दिसून येते. गेल्या पाच वर्षांत विकसित देशांच्या वाणिज्यदूतांनी आपापल्या देशातील उद्योजकांसोबत मिहानचा दौरा केला आहे. पण त्या उद्योजकांनी मिहानमध्ये एकाही उद्योगांची उभारणी केलेली नाही. अमेरिका, ब्रिटन, जपान, स्विर्त्झंलंड, झेकोस्लोव्हाकिया, दुबईचे शेख, पूर्वी सिंगापूर आणि आता चीनच्या वाणिज्यदूतांनी उद्योजकांसोबत मिहानचा दौरा केला. या दौऱ्यांची फलश्रुती काहीच नाही. मग मिहानची पाहणी हा एक सोपस्कार की गुंतवणूक, हा मुद्दा आता पुढे आला आहे. दौऱ्यानंतर वाणिज्यदूत आणि उद्योजकांची नोंद मिहानच्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षा यादीत केली जाते. हीच मिहानच्या पाहणी दौऱ्याची फलश्रुती असल्याचे सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)केवळ पाहणी अहवालविदेशी उद्योजक मिहानला भेट देतात, तेव्हा ते विविध एजन्सीच्या माध्यमातून मिहानमध्ये उपलब्ध सुविधा, सुरक्षा व्यवस्था, कुशल कामगार, विजेचा प्रश्न, जागतिक स्तरावर मिहान प्रकल्पाची पत व क्रमवारी तसेच विविध करप्रणालीची माहिती घेतात. उत्पादन प्रकल्प विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) उभारायचा झाल्यास उद्योजकांना निर्यातीचा विचार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून राहून व्यवसाय करणे सोपे नाही. अशास्थितीत स्थानिक, राज्य आणि देशांतर्गत बाजारापेठा त्यांच्यापासून दुरावतात. याच कारणांनी देशातील एसईझेडमध्ये ९० टक्के जागा रिक्त आहेत. तसेच ज्या १० टक्के जागांवर उद्योग उभे आहेत, त्यातील अर्ध्यांपेक्षा जास्त उद्योग मंदीत आहेत. त्यामुळे मिहान-एसईझेडमध्ये उत्पादित वस्तूंना स्थानिक बाजारपेठांमध्ये विकण्याची परवानगी जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत विकसित देशांचे वाणिज्यदूत आणि उद्योजकांनी मिहानचे कितीही दौरे केले तरी एकही उद्योग इथे उभा राहणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मिहान-एसईझेडमध्ये ३३ आयटी कंपन्यामिहान-एसईझेडमध्ये सुरू असलेल्या ५७ आयटी कंपन्यांमध्ये ३३ छोट्यामोठ्या आयटी कंपन्या आहेत. या कंपन्या पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या छोट जागांमध्येही सुरू करता येतात. विदेशातील आॅर्डरवर अवलंबून असल्याने या कंपन्या तग धरून आहेत. त्याच कारणांमुळे मिहानचे व्यवस्थापन आयटी क्षेत्रातील छोट्या कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. सध्या आयटी व फार्मा कंपन्या मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. पण त्यांची पहिली पसंती मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणानंतर मिहानला आहे. नवीन एसईझेड पॉलिसीची मागणी४सध्याची एसईझेड पॉलिसी नवीन उद्योगांना एसईझेडमध्ये आकर्षित करण्यात अपयशी ठरली आहे. करमुक्त प्रणालीची गरज आहे. या क्षेत्रातील उद्योगावर एमएटी, एएमटी आदींसह विविध कराची आकारणी केली जाते. शिवाय स्थानिक बाजारपेठेत माल विकण्यावर ७० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारण्यात येते. अशा करप्रणालीमुळे उद्योजक एसईझेडमध्ये उद्योग सुरू करण्याचा विचारही करीत नाही. लवकरच घोषित होणाऱ्या एसईझेड पॉलिसीमध्ये करमुक्त धोरणांचा समावेश असावा, अशी उद्योजकांची मागणी आहे.