शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मायग्रेनची समस्‍या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

नागपूर : मायग्रेन ही सामान्‍य समस्‍या आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्‍ये त्‍याचे प्रमाण अधिक आढळते. हार्मोन्‍समधील बदल, अपौष्‍टिक आहार, अतिताण, ...

नागपूर : मायग्रेन ही सामान्‍य समस्‍या आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्‍ये त्‍याचे प्रमाण अधिक आढळते. हार्मोन्‍समधील बदल, अपौष्‍टिक आहार, अतिताण, झोपण्‍याची व उठण्‍याची चुकीची सवय, औषधांचा अतिरेकी वापर आदी त्‍यामागे कारणे आहेत. ‍यावर वेळीच उपचार आवश्यक आहे, असे मत डॉ. देबाशिष चौधरी यांनी व्‍यक्‍त केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे १८ ते २४ डिसेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ ही या वर्षीची संकल्पना आहे. चर्चासत्राच्या आज तिसऱ्या दिवशी डॉ. सुधीर कोठारी (पुणे), डॉ. देबाशिष चौधरी (नवी दिल्ली), डॉ. हृषिकेश कुमार (कोलकाता) सहभागी झाले होते.

औषधांबरोबर नियमित योगासने, व्‍यायाम, पौष्‍टिक आहार घेतला तर ही समस्‍या दूर केली जाऊ शकते असे सांगत डॉ. चौधरी म्हणाले, मायग्रेनवर इंजेक्‍शनही आले आहे. ते घेतल्‍याने एक महिना मायग्रेनपासून दूर राहता येते. त्‍यानंतरही ही समस्‍या दूर झाली नाही तर शस्‍त्रक्रियेचा पर्यायदेखील उपलब्‍ध आहे.

डॉ. सुधीर कोठारी यांनी ‘भोवळ येणे’ या विषयावर आपले विचार मांडले. त्‍यांनी भोवळ, चक्‍कर येणे म्‍हणजे काय, ती कशामुळे येते, त्याचे प्रकार कोणते, त्‍यावर उपाय काय आहेत, याबद्दल माहिती दिली. ते म्‍हणाले, शरीराचे संतुलन चांगले असते तेव्‍हा आपण त्‍याकडे दुर्लक्ष करतो. पण संतुलन बिघडले की चक्‍कर येण्‍यासारख्‍या समस्‍या उद्भवतात. कानात असलेली सूक्ष्‍म प्रणाली शरीराचे संतुलन साधण्‍याचे काम करते. त्‍यात बिघाड झाला तर शरीराचे संतुलन बिघडते व चक्‍कर यायला लागतात.

‘गेट डिसऑर्डर्स’ या विषयावर डॉ. हृषिकेश कुमार यांनी विचार मांडले. ते म्हणाले, पायांचा नियमित व्‍यायाम केला, चालताना काळजी घेतली, डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याने औषधे घेतली तर बऱ्याच अंशी ही समस्‍या दूर होऊ शकते. ज्‍या व्‍यक्‍तींना नीट चालता येणे शक्‍य नसते, त्‍यांच्‍याप्रति सहानुभूती ठेवण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.

अध्‍यक्षस्‍थानी हैदराबादचे आयएएनचे माजी अध्‍यक्ष डॉ. सुभाष कौल व एमडीएसआयचे अध्‍यक्ष डॉ. विनय गोयल होते. राष्‍ट्रीय मेंदू सप्‍ताहाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी प्रास्‍ताविक केले व सर्वांचे आभार मानले.