शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोरिजन समिती नावापुरतीच

By admin | Updated: July 7, 2016 02:58 IST

नागपूर महानगर क्षेत्राचा (मेट्रोरिजन)सर्वांगीण विकास व्हावा, यात लोकसहभाग असावा, या हेतूने नागपूर महानगर नियोजन समिती गठित करण्यात आली आहे.

निवडणुकीनंतर एकच बैठक : काँग्रेसचा आगामी बैठकीवर बहिष्कार नागपूर : नागपूर महानगर क्षेत्राचा (मेट्रोरिजन)सर्वांगीण विकास व्हावा, यात लोकसहभाग असावा, या हेतूने नागपूर महानगर नियोजन समिती गठित करण्यात आली आहे. परंतु या समितीची निवडणूक झाल्यानंतर एकदाच बैठक झाली. एवढेच नव्हे तर नासुप्रने महानगर प्रारूप विकास आराखडा तयार करतानाही समितीच्या सदस्यांना साधी विचारणाही केलेली नाही. या समितीला कोणतेही अधिकार नसल्याने ही समिती नावापुरतीच उरली आहे.महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे ) अधिनियम १९९९ पासून अमलात आलेला आहे. त्यानुसार २००८ मध्ये निवडणुकीद्वारे महानगर नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता नासुप्रने प्रारुप विकास योजना राज्य सरक ारकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. महानगर नियोजन समितीने कोणताही विकास आराखडा तयार केलेला नाही. नासुप्रने तयार केलेल्या प्रारूप विकास योजनेच्या विकास आराखड्याला ३१ जानेवारी २०१५ ला मंजुरी देण्यात आली आहे. महानगर नियोजन क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, या हेतूने हा आराखडा तयार करण्यात आल्याचा दावा नासुप्रने केला आहे. परंतु यात काही गावात निवासी क्षेत्र कृषी क्षेत्र दर्शविण्यात आले आहे. काही ठिकाणी कृषी क्षेत्राला निवास व औद्योगिक क्षेत्रात टाकण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. असे असतानाही आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. आराख्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ८ जुलैला मुंबई येथे नियोजन समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस सदस्यांनी या बैठकीला विरोध दर्शविला असून बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. विकास आराखडा एका खासगी कंपनीने कार्यालयातच तयार केल्याचा आरोप महानगर नियोजन समितीच्या सदस्य व काँग्रेसच्या नगरसेविका रेखा बाराहाते, सदस्य सुरेश जग्यासी, दीपक कापसे, संजय महाकाळकर यांनी केला आहे.बैठक नागपुरात का घेतली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विकास आराखड्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विरोध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)