शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रशियन रुळावरून धावणार मेट्रो

By admin | Updated: May 2, 2017 01:30 IST

शहरातील मेट्रो प्रोजेक्टअंतर्गत पीलर व मेट्रो स्टेशनच्या निर्माण कार्यासोबतच रेल्वे रुळ टाकण्याचेही काम वेगाने सुरू झाले आहे.

४० किलोमीटरचा मार्ग : १५ मेपर्यंत १० हजार टनाचे रुळ पोहोचणार आनंद शर्मा नागपूरशहरातील मेट्रो प्रोजेक्टअंतर्गत पीलर व मेट्रो स्टेशनच्या निर्माण कार्यासोबतच रेल्वे रुळ टाकण्याचेही काम वेगाने सुरू झाले आहे. यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने रशिया येथील एका कंपनीला मेट्रोचे रुळ पुरवठा करण्याचा कंत्राट दिला आहे. त्यानुसार पुढील १२ ते १५ मेपर्यंत ४० किलो मीटरच्या मेट्रो मार्गासाठी रशिया येथून १० हजार टन रेल्वे रुळ नागपुरात पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार भविष्यात नागपूरची मेट्रो रेल्वे ही अत्याधुनिक रशियन रुळावरून धावणार आहे.महामेट्रोच्या अधिकारी सूत्रानुसार मेट्रोच्या हिंगणा आणि मिहान येथील डेपोसह उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम कॅरिडोरसाठी सुमारे ४० किलोमीटर लांब रुळांची गरज आहे. रेल्वेच्या तांत्रिकी भाषेत या रुळांना ‘रेल’ म्हटल्या जाते. या ४० किलोमीटरच्या मार्गापैकी विमानतळ ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत ५.६ किलोमीटरच्या अपग्रेड सेक्शनमध्ये रुळांना गिट्टीच्यावर सिमेंटच्या स्लीपरसोबत जोडले जाणार आहे. याशिवाय उर्वरित ३५ किलोमीटरच्या मार्गावर स्लॅब तयार करून त्यावर रुळ बसविले जाईल. नागपूर मेट्रो ही ९० किलोमीटरच्या वेगाने धावणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी रशिया येथील अत्याधुनिक रुळ आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात मेट्रोचे रुळ तयार होत नाही भारतात अजूनपर्यंत मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी लागणारे रुळ तयार केले जात नाही. त्यामुळे देशातील मेट्रो प्रोजेक्टसाठी जपान, आॅस्ट्रिया किंवा रशिया या देशाकडून ते आयात करावे लागतात. भारतीय रेल्वेसुद्धा आता या रुळांचा उपयोग करण्यासंबंधी विचार करू लागली आहे. काय आहे वैशिष्ट्य रशियावरून येणाऱ्या या रुळांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या रुळांच्या वरचा भाग फार मजबूत असतो. यामुळे मेट्रो धावताना रुळ आणि रेल्वेच्या चाकामध्ये अधिक घर्षण होत नाही. यामुळे रुळ आणि रेल्वेच्या देखभालीवरील खर्च कमी होतो. उन्हाळा आणि थंडीचा सुद्धा या रुळांवर काहीही परिणाम होत नाही. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई पोहचणार नागपूर मेट्रो रेल्वेसाठी रशियावरून येत असलेले रुळ पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यानंतर ते रुळ नागपुरात आणले जाईल. मात्र त्यासाठी १२ ते १५ मेपर्यंतचा वेळ लागणार आहे.