शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांची सेवा हाच संत मदर तेरेसाचा संदेश

By admin | Updated: September 12, 2016 02:47 IST

गरिबांची सेवा करताना मदर तेरेसांना ईश्वराची अनुभूती झाली. आता त्या जगाच्या आई झाल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस : मदर तेरेसा यांच्या पुतळ्याचे अनावरणनागपूर : गरिबांची सेवा करताना मदर तेरेसांना ईश्वराची अनुभूती झाली. आता त्या जगाच्या आई झाल्या आहेत. त्यांचे कार्य जगाच्या ५२ देशात सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा हाच संत मदर तेरेसाच्या जीवनाचा संदेश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. कामठी रोडवरील सेंट फ्रान्सिस डिसेल्ट कॅथेड्रालच्या प्रांगणात मदर तेरेसा यांना संत ही सर्वोच्च पदवी बहाल केल्याबद्दल आयोजित संत समारोहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. याप्रसंगी आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिस अहमद उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते मदर तेरेसाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)रंजल्या गांजल्यांसाठी समर्पित जीवन - नितीन गडकरीसंत मदर तेरेसा या ममतेच्या सागर होत्या. त्यांचे जीवन रंजल्या गांजल्यासाठी समर्पित होते. जात धर्म पंथ भाषेच्या पलिकडे जाऊन काम करावे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्या प्रमाणे ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ या मार्गावर मदर तेरेसा चालल्या आणि त्यांना संतत्व बहाल झाले. सेवेसाठी कुठल्याही देशाच्या सीमा आडव्या येत नाही. त्यांचे कार्य जगभर होते, असेही गडकरी म्हणाले. प्रास्ताविक आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा यांनी केले. पत्रकार जोसेफ राव यांनी परिचय करून दिला. संचालन फादर प्रशांत यांनी केले तर सिस्टर कुरिया कोसा यांनी आभार मानले. यावेळी बिशप पॉल दुपारे, रेव्हरंट फादर क्रिस्टोफर, नेल्सन फ्रान्सिस, फिलिप्स जैसवाल, पिटर घाटगे, गुरुद्वाराचे गुरुग्रंथी मनदीप सिंग, मौलाना पारेख, अर्चना सिंग उपस्थित होत्या.