शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पारा घसरला, थंडी वाढली

By admin | Updated: December 25, 2016 03:04 IST

नागपुरात थंडीचा जोर कायम आहे. शनिवारी किमान तापमानात सरासरीपेक्षा चार अंशाची घट झाली.

नागपुरात किमान तापमान ८.५ अंशावर नागपूर : नागपुरात थंडीचा जोर कायम आहे. शनिवारी किमान तापमानात सरासरीपेक्षा चार अंशाची घट झाली. पारा ८.५ अंशांपर्यंत खाली पोहचला. गोंदियात थंडीची लाट कायम असून येथे पारा ७.७ अंशापर्यंत खाली घसरला आहे. येत्या दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हवा उत्तर-पश्चिमकडून दक्षिण-पश्चिमकडे वाहत आहे. हवेचा वेग मंदावला असल्यामुळे पारा ८ ते ११ अंशादरम्यान स्थिरावला आहे. हवेची गती वाढली तर पारा आणखी घसरू शकतो. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दिवसभर ऊन निघाले. अकोला येथे ९.६, वर्धा व चंद्रपूरमध्ये १०, ब्रह्मपुरी १०.७, अमरावती येथे १०.८, यवतमाळ येथे ११, बुलडाणा येथे १२.५, वाशिम येथे १५.८ अंश सेल्सियस तापमान नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी) डिसेंबरच्या शेवटी थंडी वाढणार डिसेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढत असल्याचा अनुभव आहे. गेल्या दहा वर्षात २५ डिसेंबरनंतरच सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे. यावर्षीही डिसेंबरच्या शेवटी थंडी वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी १९ डिसेंबर रोजी पारा ७.८ अंशापर्यंत खाली घसरला असून या मोसमातील आजवरचा हा सर्वात थंड दिवस राहिला आहे. थंडीने गारठून वृद्धाचा मृत्यू ? शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सक्करदरा उड्डाण पुलाखाली एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. कडाक्याच्या थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. राकेश बबनराव निकम (वय २९, रा. खरबी) यांनी दिलेल्या सूचनेवरून सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे.