शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याची रोकड लुटणारे जेरबंद : शानशौकासाठी गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:13 IST

स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या तीन अल्पवयीन दरोडेखोरांसह पाच जणांना अटक करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.

ठळक मुद्देतीन अल्पवयीन आरोपींचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या तीन अल्पवयीन दरोडेखोरांसह पाच जणांना अटक करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.सीताबर्डीच्या महाजन मार्केटमध्ये असलेल्या स्वानंद ट्रेडिंग कंपनीत कामाला असलेल्या जयंत नारायणराव मडावी (वय ३१, रा. पिंपळगाव आर्वी, जि. वर्धा) या पल्सरस्वाराला चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी २ लाख, ४५ हजार, ५७६ रुपये लुटून नेले होते. गुरुवारी दुपारी ३.३० ला जलाराम मंदिराजवळ गोकुळ भवनसमोर ही घटना घडली होती.भरदुपारी वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्याने व्यापारी वर्तुळासह पोलिसांतही प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी लुटारूंच्या शोधासाठी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यातून धागेदोरे जोडत शनिवारी सकाळी या लुटमारीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी (वय १८, रा. छोटा लोहारपुरा, गांधीबाग) आणि नियाज गुलाम मुस्तफा (वय १९, राजीव गांधीनगर, यशोधरानगर) या दोघांना तसेच त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. रिजवान याने आयटीआय केले असून तो एसी (एअर कुल्ड) उपकरण दुरुस्तीचे काम करतो. तर नियाजने बारावीपासून शिक्षण सोडले असून, त्यांचे अल्पवयीन साथीदारही विद्यार्थीच आहेत. ते सर्व शानशौकिन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळल्याचे समजते. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेतील १ लाख, ६९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात लकडगंजच्या पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली.पेट्रोल पंपापासून पाठलागभरदुपारी वर्दळीच्या ठिकाणावर दरोडा घालण्याची योजना आरोपींनी गुन्हा करण्याच्या काही वेळेपूर्वी एका पेट्रोल पंपावर आखली. जयंताने पल्सरमध्ये पेट्रोल भरल्यानंतर रोकड असलेल्या बॅगमधून काही नोटा काढल्या आणि पेट्रोलचे पैसे दिल्यानंतर त्या पुन्हा बॅगेत कोंबल्या. यावेळी आरोपी रिजवान आणि नियाज बाजूलाच होते. त्याच्या बॅगमध्ये मोठी रोकड असल्याची कल्पना आल्यामुळे लुटण्याचा कट रचला. जयंतचा पाठलाग करून संधी मिळताच रोकड लुटल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटक