शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीबाबत मनपा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत

By admin | Updated: July 1, 2017 02:26 IST

ज्याप्रमाणे सामान्य माणूस जीएसटी (गुड्स अ‍ॅण्ड सर्विस टॅक्स) बाबत गोंधळात आहे, तशीच स्थिती महापालिकेची झाली आहे.

नोंदणी केली, जाहिरातींवर कर लागण्याची चिन्हे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्याप्रमाणे सामान्य माणूस जीएसटी (गुड्स अ‍ॅण्ड सर्विस टॅक्स) बाबत गोंधळात आहे, तशीच स्थिती महापालिकेची झाली आहे. महापालिकेने स्वत:ची जीएसटीमध्ये नोंदणी करून नंबर तर मिळविला आहे, परंतु महापालिकेच्या कोणत्या सेवेवर किती जीएसटी लागेल, जीएसटी लागू झाल्यावर किती अनुदान मिळेल, केव्हा मिळेल या सर्व बाबींबाबत महापालिका ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. महापालिकेचा आर्थिक गाडा जीएसटीवर अवलंबून आहे. जेवढा जास्त जीएसटी मिळेल तेवढी महापालिका प्रगती करेल. जीएसटी लागू होण्याचे संकेत मिळत असताना काही महिन्यांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी १ हजार ६५ कोटी रुपये जीएसटीच्या अनुदानाच्या रूपात मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. आता विस्तृत रूपरेखा तयार करून राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु, जीएसटीपासून होणारे उत्पन्न, त्याच्या वितरणाचा फार्म्युला आदीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. जाहिरातींपासून होणाऱ्या उत्पन्नावरही महापालिकेला पाच टक्के जीएसटी भरावा लागेल, अशी चर्चा आहे. महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जीएसटीची अधिसूचना जोवर जारी होत नाही तोवर काहीही भाष्य करणे कठीण आहे. अधिसूचनेनंतरच महापालिकेच्या अधिकारक्षेत्राबाबत खुलासा होईल. २८ जून रोजी महापालिकेला जीएसटी नंबर मिळाला आहे. ३० जूनच्या मध्यरात्री देशातील सर्व प्रकारचे कर समाप्त होतील. १ जुलैपासून जीएसटी देशभरात लागू होईल. १० जुलैपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जीएसटीचा मनपाला फायदा : जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी सांगितले की, जीएसटी लागू झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती निश्चितच उत्तम होईल. उत्पन्न वाढल्यामुळे विकास कामांना गती मिळेल. महापालिकेने १ हजार ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तीन महिन्यानंतर चित्र स्पष्ट महापालिकेला जीएसटीपासून किती अनुदान मिळेल हे तीन महिन्यानंतर स्पष्ट होईल. महापालिकेला जीएसटीपासून दर तीन महिन्यांनी निधी मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनाही याची माहिती आहे. मात्र, याचा फार्म्युला निश्चित नसल्यामुळे नेमका किती निधी मिळेल याबाबत संभ्रम कायम आहे. अधिकारी, कंत्राटदारांसाठी कार्यशाळा जीएसटीचे बारकाव्यांबाबत अधिकारी व कंत्राटदारही अनभिज्ञ आहे. यासाठी जीएसटीच्या प्रारूपाबाबत त्यांना माहिती देण्यासाठी २ जुलै रोजी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. तीत तज्ज्ञ चार्टर्ड अकाऊंटन्ट मार्गदर्शन करतील.