इंदिरा गांधी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार : रुग्णांचा जीव धोक्यातसुमेध वाघमारे नागपूरनागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. परंतु तंत्रज्ञाच्या (टेक्निशियन) भरोशावर महानगरपालिका आपले रुग्णालय चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात लोकमत प्रतिनिधी रुग्ण म्हणून गेला असताना चक्क ईसीजी काढणाऱ्या महिला तंत्रज्ञाने तपासले. याशिवाय रांगेत असलेल्या अनेक रुग्णांना तपासत कुणाला इंजेक्शन तर कुणाला औषधे लिहून दिली. विशेष म्हणजे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखत हा प्रकार सर्रास सुरू होता. ‘मुंबई प्रांतीय म्युनिसिपल कायदा १९४९’ मधील ‘कलम ६३’ नुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर नागपूर मनपाला पडल्याचे दिसून येते. एकूण आरोग्यकारक परिस्थितीचा अभाव व जोडीला आरोग्यसेवांची भीषण दुरवस्था व विषमता यामुळे नागरिकांच्या आरोग्याची गुणवत्ता ढासळत असून यास महानगरपालिका व सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणाच संपूर्णपणे जबाबदार असल्याचे ‘लोकमत’च्या या ‘स्टींग आॅपरेशन’मुळे समोर आले आहे. असे केले ‘स्टींग आॅपरेशन’गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात शनिवारी सकाळी ११ वाजता प्रस्तुत प्रतिनिधीने आपले नाव बदलवून ‘टायफाईड’चा रुग्ण म्हणून नोंदणी पत्र काढले. यावेळी खिडकीवरील महिला कर्मचाऱ्याने खोली क्र. ४ येथे जाण्यास सांगितले. तिथे सहा-सात रुग्ण डॉक्टरांची प्रतीक्षा करीत बसले होते. दहा मिनिटानंतर तोंडाला मास्क बांधलेली एक महिला आत आली. डॉक्टरांच्या खुर्चीवर बसत रुग्ण तपासू लागली. प्रतिनिधीचा नंबर आल्यावर त्या महिलेकडे ताप येत असून टायफाईड झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्या महिलेने रक्ताची चाचणी करण्यास लिहून दिले.
मनपा रुग्णालयात टेक्निशियन तपासतो रुग्ण
By admin | Updated: November 15, 2015 01:56 IST