शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सीताबर्डीत मेफेड्रॉन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:50 IST

अमली पदार्थातील सर्वात घातक आणि महागडा पदार्थ समजले जाणाऱ्या एमडी (मेफेड्रॉन) पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे एमडी जप्त करण्यात आले. शनिवारी आणि रविवारी अशा २४ तासात सीताबर्डीत या दोन वेगवेगळ्या कारवाया वेगवेगळ्या पोलीस पथकाने बजावल्या.

ठळक मुद्दे२४ तासात दोन कारवाया : दोन लाखांचे अमली पदार्थ जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमली पदार्थातील सर्वात घातक आणि महागडा पदार्थ समजले जाणाऱ्या एमडी (मेफेड्रॉन) पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे एमडी जप्त करण्यात आले. शनिवारी आणि रविवारी अशा २४ तासात सीताबर्डीत या दोन वेगवेगळ्या कारवाया वेगवेगळ्या पोलीस पथकाने बजावल्या.सीताबर्डीतील आनंदनगरात राहणारा आरोपी मृणाल मयूर गजभिये (वय २३) एमडीची खेप घेऊन येणार असल्याची माहिती सीताबर्डीचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. काळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी कारवाईसाठी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीताबर्डी पोलिसांनी रविवारी दुपारी २ च्या सुमारास आनंदनगरातील बॉम्बे स्कूटर्सच्या मागे धाव घेतली. आरोपी गजभिये येताना दिसताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चक्क ३५ ग्राम एमडी पावडर मिळाले. बाजारात त्याची किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. ते पावडर आणि ५०० रुपये जप्त करण्यात आले. सीताबर्डी ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गजभियेला अटक करण्यात आली. आरोपी मृणाल गजभिये गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्याविरुद्ध गेल्या वर्षी प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली सीताबर्डीत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यापासून तो फरार होता.पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक निरीक्षक प्रवीण काळे, उपनिरीक्षक एस. बी. काळे, एस. सी. चव्हाण, हवालदार अजय काळे, नायक विशाल अंकलवार, ओमप्रकाश भरतिया, शिपायी प्रीतम यादव, संदीप भोकरे तसेच गुन्हे शाखेचे हवालदार दत्ता बागुल यांनी ही कामगिरी बजावली.गुन्हे शाखेचीही कारवाईशनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अनमोल सिद्धार्थ खोब्रागडे (वय ३२) याला जेरबंद केले. त्याच्याकडून ८१ हजार रुपये किमतीचे २७ ग्राम मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजू बहादुरे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली. विशेष म्हणजे, पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीबाबत ४८ तास गुप्तता पाळली. ती कोणत्या कारणामुळे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटक