शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक

By admin | Updated: August 31, 2015 02:49 IST

मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक नुकतीच डीआरएम कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.

विविध सूचना : प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या सुविधानागपूर : मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक नुकतीच डीआरएम कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. बैठकीत सदस्यांनी रेल्वे समस्यांशी निगडित अनेक सूचना केल्या.रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षस्थानी ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह होते. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रवाशांना बसण्यासाठी केलेली सुविधा, इ क्लास स्थानकांवर शौचालयाची व्यवस्था, रेल्वेस्थानक परिसराच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सणानिमित्त पुणे-कामाख्या दरम्यान विशेष रेल्वेगाडी, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी हावडा-नाशिक, वर्धा-देवळाली स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आल्याचे सांगितले. बैठकीला ‘डीआरयुसीसी’चे सदस्य ब्रिजभुषण शुक्ला, दिलीप ठकराल, सतीश यादव, सतीश बंग, निखील कुसुमगर, सुनील मिश्रा, बळवंत मोरघडे, दामोधर मंत्री, विजय गुल्हाणे, हर्षवर्धन सिंघवी, जितेंद्र देसाई, प्रभाकर सुंचुवार, क्रिष्णकुमार पांडे, त्रिशरण मिश्रा उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, अप्पर मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता परिवेश शाहू, वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दुरसंचार अभियंता मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एस. एस. चौहाण, सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील उपस्थित होते. आभार विभागीय वाणिज्य व्यवस्थापक संजय कुमार दाश यांनी मानले. (प्रतिनिधी)