शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:51 IST

विदर्भासह बोडोलॅण्ड, बुंदेलखंड, , पूर्वांचल, कुकीलॅण्ड आदी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी नवराज्य निर्माण महासंघ आता दिल्लीत दबाव निर्माण करणर आहे.

ठळक मुद्देनवराज्य निर्माण महासंघ : दिल्लीत कायमस्वरूपी कार्यालय उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह बोडोलॅण्ड, बुंदेलखंड, , पूर्वांचल, कुकीलॅण्ड आदी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी नवराज्य निर्माण महासंघ आता दिल्लीत दबाव निर्माण करणर आहे. यासाठी दिल्लीमध्ये महासंघाचे एक कायमस्वरूपी कार्यालय उघडण्यात येईल तसेच एक शिष्टमंडळ राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना दिल्लीत भेटून निवेदन सादर करतील. यासाठी येत्या २६ आॅक्टोबर रोजीची वेळ मागण्यात आली आहे.नवराज्य निर्माण महासंघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रविवारी पार पडले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे, कार्यकारी अध्यक्ष राजा बुंदेला, अ‍ॅड. रवी सन्याल, अ‍ॅड. नीरज खांदेवाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अनेक ठराव मंजूर करण्यात आले. संघटनात्मक आणि राजकीय ठरावांचा समावेश होता. नवराज्य निर्माण महासंघातर्फे आता दिल्लीत आपला दबाव निर्माण करण्यासाठी दिल्लीत कायमस्वरूपी कार्यालय उघडण्यात येईल. याचा खर्च सर्व सदस्य समानपणे उचलतील. कार्यकारी समिती तयार केली जाईल. महासंघाचे ई-मेल अकाऊंट आणि फेसबुक पेज तयार केले जाईल. नवीन राज्यांबाबत दिल्लीत चर्चासत्र व वादविवादाचे कार्यक्रम घेतले जातील. नवीन राज्य तयार करण्याबाबत केंद्र सरकारशी सातत्याने चर्चा केली जाईल. नवीन राज्याबाबत सरकारचे धोरण काय आहे. त्यासंदर्भात सुरू असलेली कारवाई याबाबत विचारणा केली जाईल. असे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी गोरखालॅण्डसाठी सुरूअसलेल्या आंदोलनाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी पूर्वांचल अ‍ॅक्शन ग्रुपचे पंकज कुमार जायस्वाल, आॅल बोडो स्टुडंट युनियनचे अध्यक्ष प्रमोद बोरो, पीपल्स जॉर्इंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर बोडोलॅण्ड मुव्हमेंटचे मुख्य संयोजक राकेश बोरो, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (प्रोग्रेसिव्ह) आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रवी सन्याल नवराज्य निर्माण महासंघाचे सचिव व प्रवक्तेविदर्भ राज्य आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. रवी सन्याल यांना नॅशनल फेडरेशन आॅफ न्यू स्टेट्स (नवराज्य निर्माण महासंघाचे) राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते म्हणून यावेळी नियुक्त करण्यात आले.विदर्भाचा मुद्दा दिल्लीतमांडत राहू-रामदास आठवलेनागपूर : रिपब्लिकन पक्ष हा नेहमीच स्वतंत्र विदर्भासह लहान राज्यांचा समर्थक राहिला आहे. यासंदर्भात आमची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. तेव्हा आपण विदर्भाचा मुद्दा दिल्लीत मांडत राहू तसेच नवीन राज्याची मागणी करणाºयांनाही आम्ही मदत करू, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नवराज्य निर्माण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि कार्यकारी अध्यक्ष राजा बुंदेला यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दुपारी रविभवन येथे रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात नवीन राज्यासंदर्भात बरीच चर्चा झाली. नवराज्य निर्माण महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशनाबाबत त्यांना कल्पना देण्यात आली. नवीन राज्यासंदर्भात पंतप्रधानांशी लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. अणे आणि राजा बुंदेला यांनी सांगितले. यावेळी नवराज्य निर्माण महासंघाचे इतर सदस्यही उपस्थित होते.रिपाइंतर्फे नोव्हेंबरमध्ये विदर्भ परिषदरिपाइंच्यावतीने १० नोव्हेंबर रोजी विदर्भ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसंदर्भात रविभवन येते रिपाइंच्या कार्यकर्त्यांसोबत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी चर्चा केली. या परिषदेसाठी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवादी नेत्यांना आधीच निमंत्रित करण्यात आले आहे याची आठवणसुद्धा आठवले यांनी अणे यांना करून दिली.