शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मेडिकल : रुग्णाच्या जेवणात की डब्यात शेणसदृश गोळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:44 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) रुग्णाला दिल्या जाणाऱ्या जेवणात एका रुग्णाला शेणसदृश गोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. रुग्णालय प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलच्या पाकगृहाची पाहणी करून अन्नाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविले आहे. विशेष म्हणजे, जेवणात शेण असूच शकत नाही, असे मेडिकल प्रशासनाचे म्हणणे आहे. तो गोळा शेण, मातीचा की खऱ्याचा वाळलेला चोतरा हे अद्यापही निष्पन्न झाले नाही. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाच्या डब्यातच आधीपासून हा गोळा असावा, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देऔषध प्रशासनाने अन्नाचे घेतले नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) रुग्णाला दिल्या जाणाऱ्या जेवणात एका रुग्णाला शेणसदृश गोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. रुग्णालय प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलच्या पाकगृहाची पाहणी करून अन्नाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविले आहे. विशेष म्हणजे, जेवणात शेण असूच शकत नाही, असे मेडिकल प्रशासनाचे म्हणणे आहे. तो गोळा शेण, मातीचा की खऱ्याचा वाळलेला चोतरा हे अद्यापही निष्पन्न झाले नाही. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाच्या डब्यातच आधीपासून हा गोळा असावा, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वॉर्ड क्रमांक दोन मधील खाट क्रमांक २० वर मागील दहा दिवसांपासून उमेश पवार हा रुग्ण भरती आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास रुग्णांना जेवण देणारी गाडी वॉर्डासमोर आली. वॉर्डाच्या परिचारिकेने तिच्याकडील भांड्यामध्ये पोळी, पालकाची भाजी, भात आदी पदार्थ भरून घेतले. रुग्णांनी हे जेवण घेऊन जाण्याचा सूचना दिल्या. पवार यांनी स्वत:कडील डब्यात हे जेवण घेतले. रात्री ११ वाजता जेवण करीत असताना घासात काहीतरी चुकीचे आले, असे लक्षात आले. त्याने तेवढा भाग कागदात गुंडाळून ठेवला. दुसऱ्या दिवशी बुधवारी ११ वाजता या संदर्भातील तक्रार वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे केली. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला याची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी गुरुवारी चौकशीचे आदेश दिले. हे वृत्त बाहेर येताच अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलच्या किचनची पाहणी केली. वॉर्डातील इतर रुग्णांकडून जेवणाबाबत माहिती घेतली. सोबतच अन्नाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग