शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : ६२ हजार औषधांचा साठा केला बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:30 IST

नागपूर मेडिकलमधील सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजारावर इंजेक्शनचा साठा बाद करण्यात आला. या औषधामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी तत्त्वे आढळून आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरॅनिटिडीन’मध्ये आढळला दोष!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्राप्त झालेल्या ‘अ‍ॅसिडिटी’वरील ‘रॅनिटिडीन’ इंजेक्शनमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये दोष आढळून आला. तब्बल वर्षभरानंतर आता ‘रॅनिटिडीन’ गोळ्या व इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहे. यामुळे नागपूर मेडिकलमधील सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजारावर इंजेक्शनचा साठा बाद करण्यात आला. या औषधामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी तत्त्वे आढळून आल्याची माहिती आहे. अन्न व औषध प्रशासन याची तपासणी करीत आहे.घाटी रुग्णालयात रॅनिटिडीन इंजेक्शनच्या एका बॅचमध्ये बुरशीसदृश प्रकार गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी समोर आला होता. दोष आढळून आलेल्या तब्बल २२ हजार इंजेक्शनचा रुग्णांना वापर झाल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. तब्बल वर्षभरानंतर गेल्याच आठवड्यात या औषधांचा वापर थांबविण्याचे पत्र सर्व रुग्णालयांना आरोग्य विभागाने दिले. प्राप्त माहितीनुसार, राज्यातील सर्वच मेडिकलला हाफकिन कंपनीकडून या इंजेक्शन व गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. दोष असल्याची शंका समोर येताच या औषधासंदर्भात अनेक देशांचे अहवाल गोळा करण्यात आले. त्यानुसार ‘रॅनिटिडीन’ औषधांमध्ये ‘एन-नायट्रोसोडामिथेलायमाइन’ (एनडीएमए) कमी प्रमाणात आढळून आले. ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेनुसार सदर घटक कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ‘रॅनिटिडीन’च्या उत्पादकांकडील कच्चा माल व इतर आवश्यक बाबींची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे तर आरोग्य विभागाने पुढील आदेशापर्यंत इंजेक्शन व गोळ्यांचा वापर थांबविण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर मेडिकलला उपलब्ध झालेल्या गोळ्या व इंजेक्शन रुग्णसेवेतून बाद करण्यात आले आहे. यात सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजार इंजेक्शन असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे, पुरवठा झालेल्या ३० टक्के औषधांचा वापर झाला आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयmedicinesऔषधं