शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कर्मचाºयांचे ‘क्वॉर्टर्स’ शौचालयाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:59 IST

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरात असले तरी येथील कर्मचारी मात्र मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहेत.

ठळक मुद्देउघड्यावर शौचाला जाण्याची वेळ : शहरातील स्वच्छता मोहिमेची ऐसीतैसी

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरात असले तरी येथील कर्मचारी मात्र मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहेत. ‘क्वॉर्टर्स’मध्ये शौचालय नसल्यामुळे ‘मेडिकल’चे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना चक्क शौचासाठी उघड्यावर जावे लागत आहे. केंद्र व राज्य शासन शौचालयांसंदर्भात जनजागृती मोहीम चालवत असून मनपाने तर शहर हागणदारीमुक्त असल्याचा दावा केला आहे. अशा स्थितीत ‘मेडिकल’मधील हे वास्तव या दाव्यांची पोलखोल करणारेच आहे.‘मेडिकल’च्या ‘टीबी वॉर्ड’ परिसरातील धोबी घाटाला लागून चाळसदृश्य ‘क्वॉर्टर्स’ आहेत. येथे ‘मेडिकल’ तसेच ‘सुपर स्पेशॅलिटी’त काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहतात. या वस्तीतील सात गल्ल्यांमध्ये एकूण ९८ ‘क्वॉर्टर्स’ आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन अशी एकूण चार सार्वजनिक शौचालये आहेत. मात्र या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. येथे दरवाजे नाहीत.केवळ ६ ‘क्वॉर्टर’मध्ये शौचालयया वस्तीतील ‘क्वॉर्टर्स’मध्ये शौचालय बनविण्याचा प्रयत्न झाला होता. ‘मेडिकल’ला मागणी केल्यानंतर मागील वर्षी शौचालय बनण्यास सुरुवात झाली. मात्र ते काम अर्ध्यातूनच बंद झाले. ९८ पैकी केवळ सहा ‘क्वॉर्टर्स’मध्येच शौचालय बनले. यादरम्यान काही सामान चोरी गेले आणि कंत्राटदाराने काम बंद केले. त्यानंतर कुणीही पुढाकार घेतला नाही. काही रहिवाशांनी आपल्या पैशांनी शौचालये तयार केली. मात्र ‘सिवर लाईन’ नसल्यामुळे आणखी अस्वच्छता पसरत आहे.नगरसेवक म्हणतात, मनपाकडे जबाबदारी द्यायासंदर्भात नगरसेवक विजय चुटेले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. जर ‘मेडिकल’ला या परिसराची निगा राखता येत नसेल तर मनपाकडे याची जबाबदारी दिली पाहिजे. या प्रकरणाची अनेकदा तक्रार करण्यात आली आहे. मात्र अधिष्ठाता लक्ष देत नाहीत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय नेहमीच बंद राहते, असे त्यांनी सांगितले. या स्थितीची तक्रार मुख्यमंत्र्यांकडेदेखील करण्यात आली होती. १६ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अधिष्ठात्यांना पत्रदेखील लिहिले होते. मात्र त्यावर ‘मेडिकल’ प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही. दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या पत्राचीदेखील दखल घेण्यात आलेली नाही.