शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे पाणी अशुद्ध

By admin | Updated: October 17, 2016 02:38 IST

पाणी म्हणजे जीवन! तेच जर दूषित झालं, तर आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो.

नीरीचा अहवाल : रुग्णांचा जीव धोक्यातसुमेध वाघमारे नागपूरपाणी म्हणजे जीवन! तेच जर दूषित झालं, तर आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणूनच पाणी उकळून, गाळून पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु रुग्णालयातच अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असेल तर...मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) मेडिकलमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा अहवाल दिल्याने खळबळ उडाली आहे.मेडिकलला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ६० वर्षे जुनी आहे. त्यावेळची रुग्णसंख्या गृहीत धरून ही सोय करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात यात कोणतेही बदल झाले नाहीत. मेडिकलला महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या मुख्य टाकीतून संपूर्ण मेडिकल व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला पाणीपुरवठा होतो. मेडिकलमध्ये १५०० वर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा राबता असतो. यामुळे रोज ३० लाख लिटर पाण्याची गरज असताना साधारण २२ ते २५ लाख लिटरपर्यंत पाणी मिळते. परंतु या पाण्याची योग्यता तपासली असता हे पाणी अयोग्य असल्याचे सामोर आले आहे. विशेष म्हणजे, मेडिकल प्रशासन रुग्णांवरील उपचारांना घेऊन कठोर उपाययोजना अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालयाच्या देखभालीकडे विशेष लक्ष देत नसल्याने हा प्रकार होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दूषित पाण्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जीव धोक्यात आला आहे. ९० टक्के पाणी अशुद्ध‘नीरी’च्या वॉटर टेक्नालॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंटने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात मेडिकलमधील विविध वॉर्ड, विभाग, अतिदक्षता विभागातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. यात रुग्णालयाच्या साधारणपणे ९० ठिकाणामधील नळाला पाणी अशुद्ध येत असल्याचे निष्पन्न आले. मात्र मुख्य टाकीपर्यंत येणारे पाणी हे शुद्ध असल्याचाही निर्वाळा देण्यात आला.