शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये रुग्णांची उपासमार!

By admin | Updated: December 9, 2015 03:28 IST

अधिवेशन काळात तरी दोन वेळ पोटभर जेवण मिळेल, या आशेवरही पाणी फेरले गेले आहे. कधी एक पोळी

सुमेध वाघमारे   नागपूर अधिवेशन काळात तरी दोन वेळ पोटभर जेवण मिळेल, या आशेवरही पाणी फेरले गेले आहे. कधी एक पोळी तर कधी तीही मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय मेडिकलमध्ये सुरू आहे. नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आणि तोही निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याने रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे. आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील मिळून एकूण सुमारे ८०० रुग्णांना सकाळच्या नाश्तासह दोन वेळेचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा मेनू ठरलेला आहे. परंतु तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे कधी एक पोळी तर कधी तीही मिळत नाही. भाजीच्या नावाखाली लवकी व भोपळ्याची रस्सेदार भाजी दिली जात आहे. वरणाच्या नावाने पिवळे पाणी ताटात ओतले जात आहे. याला पोषक आहार म्हणावा का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले आहे. परंतु अद्यापही यात बदल झालेला नाही. हिवाळी अधिवेशनाच्यनिमित्ताने का होईना वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सचिव मेधा गाडगीळ नागपुरात तळ ठोकून आहेत. तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे खुद्द मेडिकल परिसरात वास्तवास आहेत. असे असतानाही मेडिकलच्या रुग्णांची दोन वेळच्या जेवणांची भ्रांत कायम आहे.