शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : ‘टेलिमेडिसीन’मधून सात हजार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:09 IST

दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देदुर्गम व खेड्यापाड्यातील रुग्णांना विशेषज्ञांकडून मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना आरोग्यसेवा देणे म्हणजे, टेलिमेडिसीन. यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णाशी संवाद साधला जातो. याशिवाय विशेष तंत्रज्ञानामुळे ई स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे कार्य ऐकण्याची सोय आहे. रुग्णाचे एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय विशिष्ट सॉफ्टवेअरने पाठवताही येतात. या शिवाय रुग्णाचे ईसीजी, ईको, अँजिओग्राफी थेट पाहण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील रुग्णांच्या चाचण्यांची माहिती, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन उपचार केला जात आहे. या प्रकल्पाची सुरुवात २००९ मध्ये मेडिकलमध्ये झाली. सुरुवातीला ही योजना ढेपाळली. मात्र २०१३-१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे, ४९१९ रुग्णांना उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. २०१४-२०१५ मध्ये टेलिमेडिसीनच्या जागेला घेऊन बराच गोंधळ उडाल्याने हे केंद्र बंद पडल्यासारखेच होते. जुलै २०१६ पर्यंत ही स्थिती होती. परंतु त्यानंतर ‘फॅसिलीटी मॅनेजर’ची जागा भरताच गेल्या गेल्या तीन वर्षांत सात हजार दोन रुग्णांच्या समस्या सोडविण्यात आल्या.११ केंद्रांवरील रुग्णांवर होतो उपचारगडचिरोली जिल्ह्याच्या तीन, गोंदिया, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा ११ केंद्रांवरील रुग्णांवर टेलिमेडिसीनच्या मदतीने उपचार केले जात आहे. या केंद्रावरील डॉक्टरांना रुग्णांच्या उपचाराला घेऊन काही शंका असल्यास त्याचे निदान नागपूर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टर करतात. यात हृदयरोग, कान-नाक-घसा, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, कॅन्सर,अस्थिरोग, शस्त्रक्रियांसह उर्वरित विभागांशी संबंधित रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.४८९ कैद्यांना मिळाला उपचारमध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांनाही ‘टेलिमेडिसीन’द्वारे मेडिकल डॉक्टरांची वैद्यकीय सेवा दिली जात होती. यासाठी मध्यवर्ती कारागृह व मेडिकल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात आले होते. आजारी कैद्याला कारागृहातील इस्पितळामध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी निदान न झाल्यास तेथील डॉक्टर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत. आजारी कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवून उपचाराची दिशा ठरवली जायची. जून २०१८ पासून या कार्याचा प्रारंभ झाला. परंतु सहा महिन्यातच ‘कॉल’ येणे बंद झाले. या कालावधीमध्ये ४८९ कैदी रुग्णांना लाभ मिळाल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनmedicineऔषधंGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय