शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मेडिकलची रुग्णसेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:58 IST

मेडिकलच्या निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा (मास लीव्ह) सोमवार हा तिसरा दिवस असतानाही तोडगा निघाला नाही.

ठळक मुद्देउपचारासाठी तासन्तास प्रतीक्षा : डॉक्टरांचा ‘मास लीव्ह’चा तिसरा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा (मास लीव्ह) सोमवार हा तिसरा दिवस असतानाही तोडगा निघाला नाही. यातच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने बाह्यरुग्ण विभाग रुग्णाने फुल्ल होता, परंतु मोजकेच डॉक्टर असल्याने रुग्णांना उपचारासाठी तासन्तास वाट पहावी लागली. शस्त्रक्रियेचा आकडाही आता निम्म्यावर आल्याने मेडिकलची रुग्णव्यवस्था कोलमडली आहे.विशेष म्हणजे, सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी सोमवारी मेडिकलच्या निवासी डॉक्टरांशी संवाद साधला. परंतु त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) सुरक्षा रक्षक १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेल्याने रुग्णालयाची सुरक्षा वाºयावर पडली. २५ दिवस होऊनही मेडिकल प्रशासन डॉक्टरांच्या सुरक्षेकडे लक्ष देत नसल्याचे पाहत शुक्रवारी रात्री ९ वाजतापासून मेडिकलचे १५० निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले. सोमवारपर्यंत स्थिती बदलून डॉक्टर कामावर परततील अशी अपेक्षा होती. परंतु डॉक्टर तिसºया दिवशीही आपल्या मागण्यांना घेऊन कायम असल्याने हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे.१९ रुग्णांचा मृत्यूरविवारी सकाळी ८ वाजेपासून ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूला घेऊनही डॉक्टरांच्या आंदोलनाकडे पाहिले जात आहे. तातडीच्या तपासण्या, रोगाचे निदान व उपचारात होत असलेल्या उशिरामुळे रुग्णांच्या जीवावर तर बेतत नाही ना, याकडेही शंकेने पाहिले जात आहे.रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवासहायक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी आज निवासी डॉक्टरांसोबत चर्चा करून सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. त्यांनी लवकरात लवकर सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. मात्र, हे आश्वासन ‘मार्ड’च्या लेटरहेडवर लिहून देण्याची अट डॉक्टरांनी घातल्याने चर्चा फिस्कटल्याची माहिती आहे. रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवा अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही डॉ. वाकोडे यांनी डॉक्टरांना दिल्याचे समजते.आम्हाला हे सुरक्षा रक्षक नकोआमचा सुरुवातीपासून ‘युनिटी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना विरोध होता. आम्हाला ज्यांच्याकडून योग्य पद्धतीने सुरक्षा होईल असे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक हवेत. मंगळवारी या मुद्याला घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालक यांच्याशी मुंबई येथे बैठक आहे. या बैठकीत आमच्या सुरक्षेच्या मागण्या पूर्ण होतील, हा विश्वास आहे.-डॉ. प्रदीप कासवान, अध्यक्ष, मार्ड मेडिकल५० टक्के शस्त्रक्रियांना बसला फटकामेडिकलमध्ये सोमवारी गंभीर शस्त्रक्रिया १७ तर किरकोळ शस्त्रक्रिया १८ झाल्या आहेत. सूत्रानुसार, इतर दिवशी याच्या दुप्पट संख्येत या दोन्ही शस्त्रक्रिया व्हायच्या. निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे ५० टक्के शस्त्रक्रियांना फटका बसला आहे. अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचेही समजते.डॉक्टर २०, रुग्ण तीन हजारावरनिवासी डॉक्टर रजेवर गेल्याने मेडिकलच्या वैद्यकीय अधिकाºयांपासून ते सर्व वरिष्ठ डॉक्टरांची तीन पाळीत ड्युटी लावण्यात आली. त्यानुसार सोमवारी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) साधारण २० डॉक्टर आपली सेवा देत होते. परंतु आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने तीन हजारावर रुग्ण उपचारासाठी आले. परिणामी, व्यवस्थाच कोलमडली. प्रत्येक विभागासमोर रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषत: औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्सा, अस्थिरोग व स्त्री रोग व प्रसूती विभागात रुग्णांची मोठी गर्दी झाली होती. तासन्तास प्रतीक्षेनंतर रुग्णांना उपचार मिळाल्याची माहिती आहे.रात्रीपासून ६८ सुरक्षा रक्षक तैनातमेडिकलच्या सुरक्षेची जबाबदारी ‘युनिटी’ या सुरक्षा कंपनीवर देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. या कंपनीचे ६८ सुरक्षा रक्षक आपली सेवा देतील, सोबतच १० बंदुकधारी रक्षकांचाही समावेश असेल. रात्री ९ वाजेपासून यांची ड्युटी लावण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांचा सुरक्षेचा विषय आता निकाली निघाला आहे, यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे.-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल