शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमधील रुग्ण भिजले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:26 IST

गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अपघात विभागापासून, तळमजल्यावरील वॉर्डात व शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरले होते. रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. परंतु त्यानंतरही बांधकाम विभागाने विशेष उपाययोजना केली नाही. परिणामी, या वर्षी पुन्हा रुग्णांना पावसाच्या पाण्यात भिजावे लागले. वॉर्ड १७, १८, ३५ व ईएनटीमधील छताला गळती लागल्याने ऐनवेळी तारांबळ उडाली. वॉर्डात पाणी साचल्याने रुग्णसेवेत अडचणी आल्या.

ठळक मुद्देवॉर्ड १७, १८, ३५ , ईएनटी विभागाला लागली गळती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अपघात विभागापासून, तळमजल्यावरील वॉर्डात व शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरले होते. रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. परंतु त्यानंतरही बांधकाम विभागाने विशेष उपाययोजना केली नाही. परिणामी, या वर्षी पुन्हा रुग्णांना पावसाच्या पाण्यात भिजावे लागले. वॉर्ड १७, १८, ३५ व ईएनटीमधील छताला गळती लागल्याने ऐनवेळी तारांबळ उडाली. वॉर्डात पाणी साचल्याने रुग्णसेवेत अडचणी आल्या. 

सलग पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाल्यास मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरते. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या वर्षी शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात गुडघाभर पाणी शिरल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पाणी उपासण्याचे काम केल्याने दुपारनंतर रुग्णसेवा सुरळीत झाली. या संदर्भातील तक्रारी झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बांधकाम विभागाने मोठ्या व्यासाची पाईप लाईन टाकली. यामुळे सध्यातरी पावसाचे पाणी शिरले नाही. परंतु छताला गळती लागल्याने वॉर्डात पाणी साचून रुग्ण भिजले. याचा सर्वाधिक फटका शल्यक्रियाचा वॉर्ड क्र. १७, १८, मेडिसीनचा वॉर्ड क्र. ३५ व कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचा बाह्यरुग्ण विभागाला बसला. वॉर्डातील काही रुग्णाला दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले. सफाई कर्मचाऱ्यांनी तात्पुरती सोय म्हणून कुठे कुलरची टाकी, तर कुठे बादली ठेवली. विशेष म्हणजे, मेडिकलच्या बांधकाम विभागाला इमारतीच्या देखभालीसाठी मोठा निधी मिळतो, परंतु त्यांचे याकडे लक्ष नसल्याने रुग्णालय प्रशासनासह खुद्द रुग्णांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. गळतीला घेऊन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी तातडीने बांधकाम विभागाला डागडुजी करण्याचा सूचना दिल्याचे समजते.औषध भांडारातही शिरले पाणीसोमवारपासून सुरू झालेला संतधार पाऊस मंगळवारी कायम होता. परिणामी, नेहमीप्रमाणे या वर्षीही मेडिकलच्या औषध भांडारात पावसाचे पाणी शिरले. पाणी काढण्याकरिता येथे मोटार पंपाची व्यवस्था आहे. परंतु त्याचा हवा तसा फायदा होत नसल्याचे कर्मचारीच सांगतात. यातच भांडाराचा भिंतीला ओलावा येत असल्याने याचा प्रभाव औषधांवरही पडत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, जमिनीखाली असलेल्या या भांडारासाठी ९ कोटी २१ लाख खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली. २०१४ पासून बांधकाम सुरू झाले. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊन अद्यापही बांधकाम विभागाने ही इमारत मेडिकल प्रशासनाकडे हस्तांतरित केली नसल्याचे सांगण्यात येते. सूत्रानूसार, इमारतीच्या आतील बांधकामात रुग्णालय प्रशासनाने काही बदल सुचविल्याने कामात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयpwdसार्वजनिक बांधकाम विभाग