शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : कॅन्सर इन्स्टिट्यूट नव्हे श्रेणीवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 22:56 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यास व कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोईसुविधा पुरविण्यास गेल्यावर्षी प्रशासकीय मान्यता दिली होती. आता बांधकामासाठी लागणारा ७६ कोटी १० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यामुळे मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची शक्यता मावळली आहे.

ठळक मुद्दे७६ कोटीच्या बांधकामाला मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यास व कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोईसुविधा पुरविण्यास गेल्यावर्षी प्रशासकीय मान्यता दिली होती. आता बांधकामासाठी लागणारा ७६ कोटी १० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यामुळे मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची शक्यता मावळली आहे.विदर्भात कॅन्सर रुग्णांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयातील सोई अल्प आहेत. यामुळे मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची मागणी कॅन्सर रुग्णांनीच लावून धरली होती. यावर २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात कॅन्सर इन्स्टिट्यूटची घोषणा केली होती. परंतु तेव्हापासून हे इन्स्टिट्यूट अद्यापही कागदावरच आहे. या इन्स्टिट्यूटला घेऊन दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर, जून २०१७ मध्ये न्यायालयाने निर्देश देत दोन वर्षांत कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारावे, असे निर्देश दिले. परंतु आता दोन वर्षाचा कालावधी होत असतानाही इन्स्टिट्यूच्या बांधकामाला सुरुवातही झाली नाही. विशेष म्हणजे, या इन्स्टिट्यूटला घेऊन झालेल्या बैठकीत १०० खाटांच्या सर्वसुविधायुक्त इन्स्टिट्यूटला मंजुरी देण्यात आली होती. यासाठी लागणारा निधी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपलब्ध करून देण्यालाही मान्यता मिळाली. या सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाली असताना इन्स्टिट्यूटच्या ‘ओपीडी’चा प्रस्ताव संसाधनासाठी होता. परंतु प्रस्तावात संसाधनाच्या जागी साधन खरेदी या नावाने मंजूर झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. झालेली चूक निदर्शनास आणून दिल्याने हा प्रस्ताव समोर आला. आता लवकरच त्यात दुरुस्ती होऊन यंत्र खरेदीचा निधी बांधकामाकडे वळता होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने १८ डिसेंबर २०१८ रोजी काढलेल्या अध्यादेशात ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ हा शब्द वगळून टाकला आहे. त्या ऐवजी मेडिकलच्या रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यास व कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोईसुविधा निर्माण करण्याबाबत प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचे म्हटले. आता श्रेणीवर्धन अंतर्गत बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हे बांधकाम नगर विकास विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत नागपूर सुधार प्रन्यास संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcancerकर्करोग