शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल, मेयोचे डॉक्टर आजपासून संपावर

By admin | Updated: September 27, 2015 02:40 IST

मुंबईच्या केईएम रुग्णालयात शुक्रवारी रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ...

अधिष्ठात्यांना दिली नोटीस : आरोग्य व्यवस्था कोलमडणार!नागपूर : मुंबईच्या केईएम रुग्णालयात शुक्रवारी रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ नागपुरातील मेडिकल व मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी शनिवारी काळ्या फिती लावून काम केले. मात्र, मारहाण करणाऱ्या चारही आरोपींना अटक करण्याच्या मुख्य मागणीवर शनिवारी तोडगा निघाला नाही. परिणामी, सेंट्रल मार्डने आज, रविवारी रात्री ८ वाजेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मेडिकल व मेयोच्या मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी संपाचे पत्र अधिष्ठात्यांकडे सुपूर्द केले आहे. डेंग्यूच्या उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका मुलीची अवस्था फारच नाजूक होऊन तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तेथील निवासी डॉक्टरांना मारहाण केली. या घटनेच्या विरोधात केईएममधील डॉक्टर संपावर गेले. चारही आरोपींना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करा व ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावा, अशी मागणी केली. शनिवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याचे आश्वासन दिले. परंतु, अटकेबाबत नरमाईची भूमिका घेतल्याने ‘सेंट्रल मार्ड’ने हा संप राज्यभर करण्याचा निर्णय घेतला. निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(प्रतिनिधी)संपात ६०० वर डॉक्टरांचा सहभाग सर्वत्र डेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असताना मेडिकलचे सुमारे ४५० तर मेयोचे २०० निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयाची स्थिती वाईट होण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियासुद्धा पुढे ढकलल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी मार्डच्या सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.मागणी पूर्ण झाल्यावरच संप मागेचारही आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, रुग्णालयात सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविली जाणार नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. -डॉ. आयुध मकदुम, सचिव, सेंट्रल मार्ड