शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : कोविडच्या ४०० खाटा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:21 IST

मेडिकलच्या ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये लवकरच ४०० खाटांची भर पडणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोविडच्या १००० खाटांच्या निर्देशानंतर मेडिकलने पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये लवकरच ४०० खाटांची भर पडणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोविडच्या १००० खाटांच्या निर्देशानंतर मेडिकलने पुढाकार घेतला आहे. सोमवारी डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाढीव खाटांचा जागेपासून ते यंत्रसामग्री, औषधे, मनुष्यबळ आदींचा विस्तृत अहवाल अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे सादर केला आहे.नागपूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मेडिकलला भेट दिली. या वेळी त्यांनी बैठकीत १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असण्यावर नाराजी व्यक्त केली. कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिकांच्या सुटीवर, अनेक वरिष्ठ डॉक्टर कोविड रुग्णसेवेत नसल्याबद्दल व इतरही गैरसोयींवर आक्षेप घेतला. याची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी घेतली. त्यांनी कोविडच्या ४०० खाटा वाढविण्यासाठी डॉ. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड समिती स्थापन केली. यात डॉ. राजेश गोसावी, डॉ. सुशांत मेश्राम, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. बारसागडे, डॉ. दीप्ती जैन यांच्यासह डॉ. मो. फौजल, डॉ. ब्रिजेश गुप्ता व मेट्रन तायडे यांचाही समावेश करण्यात आला.४०० खाटांचे ‘एचडीयू’डॉ. गुप्ता यांनी सांगितले, वाढीव ४०० खाटा या ‘एचडीयू’ असणार. मेडिकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील १० वॉर्ड यासाठी रिकामे केले जातील. यात ७ ते ११, १४ व १७ ते २० वॉर्डाचा समावेश असेल. प्रत्येक वॉर्ड ४० खाटांचा असेल. यासाठी २०० डॉक्टर, २०० परिचारिका व १०० कर्मचाऱ्यांसह आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा अहवाल सादर केला आहे.१९ कोटींचा प्रस्तावमेडिकलमध्ये कोविडचा वाढीव ४०० खाटांसाठी १९ कोटींचा प्रस्ताव समितीने तयार केला आहे. यात मनुष्यबळ, यंत्रसामग्री व औषधांचा समावेश आहे. वॉर्ड रिकामे करण्यापासून ते ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल.डॉ. सुधीर गुप्ताअध्यक्ष, मेडिकल कोविड समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल