शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मेडिकल कॉलेजेसना ६० कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 10:14 IST

राज्यात १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्यात आल्या. एमबीबीएसच्या प्रत्येकी ५० जागांसाठी ६० कोटी देण्याचा निर्णयही झाला. यात ६० टक्के केंद्र तर ४० टक्के राज्य सरकारचा वाटा असणार आहे.

ठळक मुद्दे वाढीव ५० जागांसाठी मिळणार निधीकेवळ यवतमाळ मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्यात आल्या. एमबीबीएसच्या प्रत्येकी ५० जागांसाठी ६० कोटी देण्याचा निर्णयही झाला. यात ६० टक्के केंद्र तर ४० टक्के राज्य सरकारचा वाटा असणार आहे. हा निधी बांधकाम, यंत्रसामुग्री व लायब्ररीवर खर्च करायचा आहे. बहुतांश महाविद्यालयांनी या संदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे. परंतु केवळ यवतमाळ मेडिकलच्या प्रस्तवालाच मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन वर्षानंतर ‘एमसीआय’ वाढीव जागेला घेऊन तपासणी करणार आहे. त्या पूर्वी निधी मिळून बांधकाम दाखविणे आवश्यक असल्याने प्रत्येक महाविद्यालय या निधीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या. यामुळे २७६० वरून ३७३० जागा झाल्या. दरम्यानच्या काळात वाढीव जागेला घेऊन पायाभूत सोर्इंचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर जुलै २०१९ मध्ये आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने अतिरिक्त सचिवांची बैठक घेतली. नंतर २६ सप्टेंबर २०१९ रोजी सर्व अधिष्ठात्यांची बैठक झाली. या बैठकीत ज्या महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५० जागा वाढल्या, तिथे पायाभूत सोयी उभ्या करण्यााठी प्रत्येक जागेकरिता १.२५ कोटी निधी म्हणजे ६० कोटी देण्यावर निर्णय झाला. हा निधी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह, लेक्चर हॉल, लायब्ररी, रुग्णालयातील वाढीव खाटा व यंत्रसामुग्रीवर खर्च करण्याचा सूचना देण्यात आल्या, तसा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला पाठविलेल्या प्रस्तावात त्रुटी काढण्यात आल्या. नंतर संपूर्ण खर्च ६० कोटींमध्ये बसणारा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आले. यामुळे प्रस्तावाला उशीर झाला. सध्या प्रस्ताव पाठवून दोन ते तीन महिन्यावर कालावधी झाला आहे. परंतु यवतमाळ मेडिकलच्या प्रस्तावालाच मंजुरी मिळाली आहे.

-मंजुरीनंतरही विविध प्रक्रियेला लागणार वेळप्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निधीसाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करावा लागणार आहे. बांधकाम व यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया व नंतर प्रत्यक्ष बांधकाम होणार आहे. यात बराच वेळ जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने (एमसीआय) वाढीव जागेवरील पायाभूत सोयींच्या तपासणीसाठी तीन वर्षाची मुदत दिली आहे. आता एक वर्ष व्हायला आले आहे. मात्र, प्रस्तावाला मंजुरी नसल्याने मेडिकल कॉलेजमध्ये या विषयावरील चर्चेला जोर धरला आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय