शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल :  सफाई कर्मचाऱ्यांचा संप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:56 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेन्डंट म्हणून कार्यरत असलेले अभिजीत या खासगी कंपनीच्या १६० कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संपाचे हत्यार उपसले.वेतनात वाढ व पगारी सुटीची त्यांची मागणी होती.

ठळक मुद्देअधीक्षकांच्या समुपदेशनानंतर कर्मचारी परतले कामावर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेन्डंट म्हणून कार्यरत असलेले अभिजीत या खासगी कंपनीच्या १६० कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संपाचे हत्यार उपसले. वेतनात वाढ व पगारी सुटीची त्यांची मागणी होती. यात मेडिकलचा कुठलाही संबंध नाही. परंतु रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून याची दखल वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत असताना संपावर तोडगा काढण्याचे समुपदेशन केले. यामुळे रात्रीच्या पाळीत सर्व कर्मचारी आपल्या कामावर परतले.मेडिकलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. यामुळे अटेन्डंटची शेकडो पदे रिक्त आहेत. रुग्णांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डातून ने-आण करणे, त्यांचे नमुने प्रयोगशाळेत घेऊन जाणे, त्यांची शुश्रूषा करणे आदी कामे खोळंबली जायची. रुग्णसेवा प्रभावित व्हायची. यावर उपाय म्हणून शासनाने कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभिजीत कंपनीला कंत्राटी पद्धतीवर अटेन्डंटचे काम देण्यात आले. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून ही कंपनी मेडिकलमध्ये सेवा देत आहेत. येथील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार, वेतन १२ हजारावर असताना पाच हजार वेतन दिल्या जाते. पगारी सुटीही मिळत नाही. कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. या संदर्भात अनेकदा कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा झाली, परंतु ते ऐकून घ्यायला तयार नाहीत. यामुळे मंगळवारी सकाळपासून संप पुकारला. परंतु कोरोना संसर्गाची सर्वत्र पसरलेली दहशत, संशयित रुग्णांची वाढती संख्या व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे यांनी मध्यस्थी केल्याने रात्रीच्या पाळतील सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.