शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : मानसोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:10 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (पीजी) ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस’ने मान्यता दिल्याचा ई-मेल गुरुवारी धडकला.

ठळक मुद्देपीजीच्या चार जागा वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (पीजी) ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस’ने मान्यता दिल्याचा ई-मेल गुरुवारी धडकला. तब्बल ११ वर्षाच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. या विषयात आताचार ‘पीजी’च्या जागेसाठी प्रवेश दिला जाणार आहे.रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत मानसोपचार तज्ज्ञाची संख्या फारच कमी आहे. तीन लाख लोकांमागे एक मानसोपचार तज्ज्ञ आहे, असे असताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) १७ मधून केवळ दोनच वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार विषयात ‘पीजी’ अभ्यासक्रम सुरू आहे. यात मराठवाडा, विदर्भातील महाविद्यालयाचा समावेश नाही. यामुळे ग्रामीण भागात नावालाही मानसोपचार तज्ज्ञ मिळत नसल्याचे भीषण चित्र आहे. यासाठी मेडिकलने पुढाकार घेत संबंधित विषयात ‘पीजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नाना सुरुवात केली. मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या अभ्यासक्रमासाठी लागणारे निकष म्हणजे, एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक, एक सहायक प्राध्यापक, एक निवासी डॉक्टर व ३० खाटांचा वॉर्ड उपलब्ध करून दिले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अधिष्ठातापदाची जबाबदारी डॉ. सजल मित्रा यांच्याकडे येताच त्यांनीही विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे गेल्याच वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या आणि नंतर ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने निरीक्षण केले. गुरुवारी मानसोपचार विषयात पीजी अभ्यासक्रमाला मंजुरी दिल्याचा मेल धडकताच मेडिकलमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. हा अभ्यासक्रम खेचून आणण्यास अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह विभाग प्रमुख डॉ. प्रशांत टिपले व सहयोगी प्राध्यापक डॉ. मनीष ठाकरे यांनी परिश्रम घेतले.२००९ पासून सुरू होते प्रयत्नमेडिकलमध्ये २००९ मध्ये मानसोपचार विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्याचा प्रस्ताव ‘एमसीआय’ पाठविला होता. परंतु त्यावेळी या विषयाचे प्राध्यापक हे पदच नसल्याने ते बारगळले. २०१४ मध्ये प्राध्यापक व इतरही पदे मिळाली. तेव्हापासून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता.मानसोपचारतज्ज्ञाची संख्या वाढेलविविध कारणांमुळे मानसिक आजाराचा रुग्णांची संख्या वाढत आहे. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनात मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नाला सुरूवात झाली. अखेर मंजुरीचा ई-मेल प्राप्त झाला. येत्या वर्षात या अभ्यासक्रमासाठी चार जागेवर प्रवेश दिला जाईल. यामुळे भविष्यात मानसोपचार तज्ज्ञाची संख्या वाढून रुग्णांना याचा फायदा होईल.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय