शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मेडिकल :  दीड कोटींच्या यंत्राला रुग्ण मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 23:49 IST

Costly machine did not get patients हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ यंत्र मेडिकलच्या सेवेत २०१७ पासून रुजू झाले. परंतु औषधवैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन) व अस्थिव्यंगोपचार विभाग (ऑर्थाेपेडिक) सोडल्यास इतर विभागाला या यंत्राचे वावगे असल्याचे चित्र आहे. परिणामी, दीड कोटीच्या यंत्राला आवश्यकतेप्रमाणे रुग्ण मिळेनासे झाले आहे.

ठळक मुद्दे‘डेक्सा स्कॅन’चे मेडिसीन, ऑर्थाे विभागालाच महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात महिलांसोबत पुरुषांमध्येही ‘ऑस्टिओपोरोसिस’चे प्रमाण मोठे आहे. अशा रुग्णांमध्ये ‘हिप फ्रॅक्चर’ केव्हाही होऊ शकते. ‘डेक्सा स्कॅन’ या चाचणीद्वारे हाताची दोन्ही मनगटे, कंबरेचे हाड, पाठीचा कणा या सांध्याच्या मजबुतीची माहिती करून घेता येते. हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ यंत्र मेडिकलच्या सेवेत २०१७ पासून रुजू झाले. परंतु औषधवैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन) व अस्थिव्यंगोपचार विभाग (ऑर्थाेपेडिक) सोडल्यास इतर विभागाला या यंत्राचे वावगे असल्याचे चित्र आहे. परिणामी, दीड कोटीच्या यंत्राला आवश्यकतेप्रमाणे रुग्ण मिळेनासे झाले आहे.

मेडिकलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. रुग्णांच्या आजाराचे तात्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावेत म्हणून १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून मेडिकलच्या डॉक्टरांनी ‘डेक्सा स्कॅन’ यंत्राची मागणी केली. ‘डेक्सा स्कॅन’ म्हणजेच ‘ड्युअल एनर्जी एक्स-रे अ‍ॅब्लॉस्प्रिओमिटरी’. रुग्णाला होणारा हाडांचा त्रास व लक्षणे याचे निदान करण्यास हे यंत्र मदत करते. फेब्रुवारी २०१७ मध्ये मेडिकलमध्ये हे दीड कोटीचे यंत्र रुग्णसेवेत दाखल झाले. या अद्ययावत यंत्रामुळे‘ऑस्टिओ पॅनिया’, ‘ऑस्टिओपोरोसिस’ आणि रजोनिवृत्तीमुळे हाडांची घनता कमी होणाऱ्या रुग्णांचे निदान केले जाते. ‘डेक्सा स्कॅन’मुळे रुग्णाला पॅथालॉजिकल चाचण्या करण्याची गरज भासत नाही. शिवाय एक्स-रेच्या तुलनेत या उपकरणातून होणारा किरणोत्सर्गदेखील अत्यंत कमी स्वरूपात असतो. एका क्लिकवर हाडांची घनता मोजता येते. उपराजधानीत हे यंत्र मेडिकलसह आणखी दोन खासगी केंद्रात आहेत. खासगीच्या तुलनेत मेडिकलमध्ये माफक दरात उपलब्ध आहे. यामुळे या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होईल व रुग्णांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मेडिसीन व ऑर्थाेपेडिक विभाग सोडल्यास इतर विभागातून रुग्ण पाठविलेच जात नसल्याची माहिती आहे. यामुळे रोज चार-पाच रुग्णांचीच तपासणी होत आहे. विशेष म्हणजे, या यंत्राचा सर्वाधिक फायदा महिलांसाठी व्हायला हवा होता. परंतु स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभागासह इतरही विभागाचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधीचे हे उपकरण बंद तर पडणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय