शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 20:57 IST

लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देसंपादकांसोबत अनौपचारिक संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छपत्रपती सभागृहात ते संपादकांसोबत विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात संवाद साधत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान करण्यासाठी प्रशासानातर्फे मतदारांना स्वीप व अन्य मतदार जागृतीच्या कार्यक्रमातून आवाहन करण्यात येत आहे. साधारण ७० हजार विद्यार्थ्यांकडून पालकांनी मतदान करावे असे संकल्पपत्रदेखील भरून घेण्यात आले आहे. मतदानासाठी दिव्यांग व्यक्तींना केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बीएलओमार्फत चिठ्ठी वाटप करण्यात येणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून जलदगतीने पोस्टल बॅलेटचे वाटप करण्यात येईल.यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वर्तमानपत्रातून मतदारांना आवाहन करणे व विविध संदेशाच्या माध्यमातून संपर्क करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी १९ हजारांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनाही आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून दिले आहे. कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही अशी प्रशासनाची भूमिका आहे. स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्य, महिला बचत गट आदीद्वारे मतदार जागृती करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. यावेळी विविध वर्तमानपत्राचे संपादक उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMediaमाध्यमे