नागपूर : राज्यातील ४० अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आली. त्यात भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षकांसह विदर्भातील ९ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पदप्राप्त पोलीस अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत...
वसंत उत्तमराव जाधव (पोलीस अधीक्षक भंडारा), मनीष मधुकर ठाकरे (पोलीस निरीक्षक), अशोक कमलाकर मंगळेकर (सहायक निरीक्षक), पुरुषोत्तम शेषराव बरड (सहायक निरीक्षक), राजू ईरपा उसेंडी (एसआयडी, सिरोंचा), शरदप्रसाद रमाकांत मिश्रा (एएसआय, नागपूर), लिलेश्वर गजानन वऱ्हाडमारे (सहायक निरीक्षक, चंद्रपूर), विजय नामदेव बोरीकलर (सहायक निरीक्षक, चंद्रपूर) आणि राजेश बाबूलाल नगरूरकर (उपनिरीक्षक, बुलडाणा)
शरद मिश्रा यांची कारकीर्द ()
यंदा पोलीस मेडल मिळालेले शरद मिश्रा शहर पोलीस दलातील एकमात्र अधिकारी ठरले आहेत. १५ फेब्रुवारी १९८८ला ते पोलीस दलात रुजू झाले. सध्या ते अंबाझरीत एएसआय म्हणून सेवारत आहेत. यापूर्वी त्यांनी पोलीस मुख्यालय, विशेष शाखा, एमआयडीसी, कोराडी, तहसील, सीताबर्डी, धंतोली आदी ठिकाणी सेवा दिली आहे. या कालावधीत त्यांना वेगवेगळे २९० पुरस्कार मिळाले असून २०१८ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही मिळाले आहे.
---