शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

# Me Too : अकबर दोषी असतील तर कारवाई व्हावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:17 IST

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंघाच्या शस्त्रपूजनात काहीच गैर नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.नागपुरात रविभवन येथे त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी टू’ मोहिमेतील सर्वच आरोप खोटे असतील असे नाही. काही जण इतरांची बदनामी करण्यासाठी असे करतदेखील असतील. मात्र दुर्लक्ष करण्याजोगे हे आरोप नाहीत. एम.जे.अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे आठवले म्हणाले. मी नीतीमत्तेचे पालन करणारा असल्यामुळे माझ्यावर कधीच असे आरोप लागणार नाही, असा दावादेखील त्यांनी केला.संघाला परंपरांचे पालन करण्याचा अधिकारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान होणाऱ्या शस्त्रपूजनाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र शस्त्रपूजन हा परंपरेचा भाग आहे. त्यात गैर काहीच नाही. संघाला परंपरेचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या मुद्याचे भांडवल करून संघावर आरोप करणे अयोग्य असल्याचा चिमटा त्यांनी इतर संघटनांना काढला.लोकसभेच्या तीन जागा हव्याआगामी लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या ‘आरपीआय’च्या उमेदवारांना राज्यात तीन जागा मिळायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वत: मी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून उत्सुक आहे. तर विदर्भात एक जागा मिळायला हवी. आम्ही यंदा बहुजन व्यतिरिक्त इतर समाजातील उमेदवारांनादेखील तिकीट देऊ, असे आठवले यांनी स्पष्ट केले.विदर्भ निर्मितीला आणखी पाच वर्षेवेगळ््या विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे असे आमच्या पक्षाचे धोरण आहे. मात्र काही कारणांमुळे यंदा ती निर्मिती होऊ शकली नाही. मात्र २०२४ पर्यंत नक्कीच विदर्भ वेगळे राज्य झाले असेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.‘एमआयएम’-‘भारिप’च्या युतीमुळे फरक नाही‘एमआयएम’ व भारिप बहुजन महासंघ यांच्या युतीमुळे राज्यात ‘रालोआ’ला काहीही फरक पडणार नाही. उलट काँग्रेसला याचा फटका बसेल व आम्हाला फायदाच होईल, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMetoo Campaignमीटू