शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ड्रग पेडलर्सकडून एमडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 20:35 IST

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने नागपुरातील दोन ड्रग पेडलर्सना पकडून त्यांच्याकडून ७४ ग्राम एमडीसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईचा कुख्यात एमडी तस्कर शहाबाज रमजान खान हा नागपूरच्या ड्रग पेडलर्सना ड्रग पुरवीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

ठळक मुद्देदोघे जेरबंद, ७४ ग्राम एमडी जप्त : मुंबई कनेक्शन उघड : एनडीपीएसची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने नागपुरातील दोन ड्रग पेडलर्सना पकडून त्यांच्याकडून ७४ ग्राम एमडीसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईचा कुख्यात एमडी तस्कर शहाबाज रमजान खान हा नागपूरच्या ड्रग पेडलर्सना ड्रग पुरवीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.अंकित नारायण पांडे (वय २५, साकेतनगर, रामेश्वरी) आणि नागेंद्र ऊर्फ हनी दीपक ठाकूर (रा. गुरु तेजबहादुर नगर, नारी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.वर्धा मार्गावरून एमडीची मोठी खेप घेऊन काही तस्कर नागपुरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव कुरळे यांच्या नेतृत्वात एनडीपीएसच्या पथकाने गुरुवारी दुपारपासून तस्करांना पकडण्यासाठी सापळा लावला. वर्धा मार्गावरील खापरी बस डेपो जवळ एनडीपीएस चे पथक दबा धरून बसले. एमएच ४९/ एफ १८२७ क्रमांकाची होंडा अमेझ कार वर्धेकडून येताना दिसताच पोलिसांनी ती अडवली. त्यातील अंकित पांडे आणि हनी ठाकूरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ ७४ ग्रॅम सहा मिलिग्राम (किंमत २ लाख, ९६ हजार) आणि दोन मोबाईल सापडले. आरोपींनी या गुन्ह्यासाठी जी कार वापरली तीसुद्धा पोलिसांनी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कुठून आणले, अशी विचारणा केली असता त्यांनी कुर्ला मुंबई येथील ड्रग पेडलर्स शहाबाज रमजान खान त्याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला.अटक करण्यात आलेला पांडे आणि ठाकूर हे दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत, हे विशेष!शाहबाजचे कनेक्शनशाहबाज गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला शहाबाज रमजान खान हा कुख्यात ड्रग पेडलर्स असून त्याचे नागपूर कनेक्शन वेळोवेळी उघड झाले आहे. त्याला यापूर्वी एमडीसह नागपूर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. तो मे पर्यंत नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होता, हे विशेष!

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीArrestअटक