शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एमसीआय राज्य सदस्य निवडणूक निकालाच्या अधिसूचनेस मनाई

By admin | Updated: June 20, 2015 03:06 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)वर प्रत्येक राज्यातून एक सदस्य निवडून पाठविला जातो.

हायकोर्ट : अशोक अढाव यांची रिट याचिकानागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)वर प्रत्येक राज्यातून एक सदस्य निवडून पाठविला जातो. महाराष्ट्रासाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई येथील कॉलेज आॅफ फिजिशियन्स अ‍ॅन्ड सर्जन्सचे संचालक डॉ. गिरीश मैंदरकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची अधिसूचना काढण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तात्पुरती मनाई केली. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा करून केंद्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवांसमक्ष निवडणूक याचिका सादर केली आहे. या याचिकेची गेल्या तीन महिन्यांपासून दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे अढाव यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. प्रलंबित निवडणूक याचिका तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी त्यांची विनंती आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर वरीलप्रमाणे मनाईहुकूम दिला. तसेच, केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण विभागाचे सचिव, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण सिंगारे, डॉ. गिरीश मैंदरकर, एमसीआय सचिव व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. एमसीआय राज्य सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. निवडणूक पोस्टल बॅलेटद्वारे होते. राज्यात ७८ हजारावर मतदार आहेत. निवडणुकीत अढाव यांना सुरुवातीपासूनच अडचणीत आणण्याचे प्रयत्न झालेत. अनुमोदक व सूचक यांच्या नावाखाली त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करण्यात आला नाही असे कारण नमूद करून अढाव यांचे नामनिर्देशनपत्र रद्द करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना निवडणूक लढवता आली. निवडणुकीत मैंदरकर यांना १२ हजार तर, अढाव यांना ९३०० मते मिळाली आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे व अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.(प्र्रतिनिधी)