शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कचºयाचा खर्च वाढला तरी महापौरांना माहीतच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:43 IST

स्वच्छतेच्या बाबतीत उपराजधानीचा क्रमांक घसरला आहे. स्वच्छतेत सुधारणा झाल्याशिवाय स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार होणार नाही.

ठळक मुद्देकनकच्या वाढीव बिलाला स्थायी समितीची मंजुरी : रा.कृ.पाटील मार्गाच्या नामांतराबाबतही अनभिज्ञच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेच्या बाबतीत उपराजधानीचा क्रमांक घसरला आहे. स्वच्छतेत सुधारणा झाल्याशिवाय स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार होणार नाही. याचा विचार करता कचरा उचलण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा, यावर होणारा खर्च याची माहिती महापालिकेच्या प्रमुख म्हणून महापौरांना असणे अपेक्षित आहे.परंतु कचरा उचलण्याच्या खर्च ७.३३ कोटींनी वाढला आहे. यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांना माहीत नाही. एवढेच नव्हे तर रा.कृ . पाटील यांचे नाव असलेल्या रस्त्याचे नामांतर करून सर कस्तूरचंद डागा असे नाव देण्याच्या प्रस्तावाबाबतही आपण अनभिज्ञ असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी प्रश्नाच्या उत्तरात गुरुवारी पत्रकारांना दिली. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याची गरज आहे.नुसत्या शासन अनुदानावर विसंबून न राहता महापालिकेला उत्पन्नात वाढ करावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उत्पन्नाचे स्रोत व होणारा खर्च याची माहिती पदाधिकाºयांना असणे अपेक्षित आहे. मात्र कनक रिसोर्सेसला देण्यात येणाºया रकमेची माहिती महापौरांना नाही.४३ कोटींच्या खर्चाला मंजुरीशहरातील कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडला वर्षाला २७ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील सहा महिन्यात ३४.३३ कोटीची रक्कम देण्यात आली आहे. अतिरक्ति खर्च म्हणून ७.३३ कोटी देण्याला, पुढील सहा महिन्यात होणारा खर्च म्हणून ३५ कोटी तर मार्च २०१८ पर्यंत अंदाजे ४५ कोटींच्या खर्चाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच व्यवस्थित काम करीत नसल्यास कनक रिसोर्सेसवर दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.कनक रिसोर्सेसला शहरातील कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. पाच वर्षासाठी १३५ कोटींच्या खर्चाला मंजुरी आहे. परंतु रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने ७.३३ कोटींची वाढीव रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावरकर यांनी दिली. वास्तविक कनक रिसोर्सेला देण्यात आलेल्या बिलावर लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदविले आहे. नगरसेवकांचाही कनकवर रोष आहे. परंतु दुसरा कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत कनकला तूर्त कोणताही पर्याय नसल्याचे चित्र आहे.