शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मेयोत माती घोटाळा

By admin | Updated: July 18, 2015 02:59 IST

जागेवरच फेकलेल्या मातीच्या वाहतुकीचे वसुलले शुल्क :

संरक्षण भितीच्या बांधकामात गडबडनागपूर : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) संरक्षण भिंत बाधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातून निघालेली माती, रुग्णालयाच्या मैदानात फेकण्यात आली असली तरी ६.५ किलोमीटर दूर फेकण्यात आल्याचे दाखविल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार महानगरपालिकेच्या नाक्याबाहेर माती टाकणे आवश्यक आहे, दर्शविण्यात आलेल्या किलोमीटरवर कोणताही नाका येत नाही. असे असतानाही बांधकाम विभागाने ३ लाख ८२ हजार १९७ रुपयांच्या वाहतुकीचे बिल सादर करून मंजुरी मिळविली आहे. १७८.५० रुपये प्रती घनमीटरनुसार वाहतुकीचे शुल्क वसूल करण्यात आले आहे. बांधकाम विभागाकडे अर्ध्या किलोमीटरपासून २० किलोमीटरपर्यंत अंतराचे दर निश्चित केले आहे. परंतु बिलामध्ये ६.५ किलोमीटर दाखवून जे दर लावण्यात आले आहे, ते ‘सीएसआर रेट’मध्येच नाही. ६.५ किलोमीटरच्या अंतरासाठी १७५ रुपये प्रति घनमीटर निश्चित केले आहे. या दरात वाहनात माती भरणे, काढणे व फेकण्याच्या दराचाही समावेश आहे. मेयोमध्ये संरक्षण भिंतीची माती फेकण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर इतरही कामात हा प्रकार झाल्याची शंका वर्तविली जात आहे. या प्रकरणाच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष नीरज कुकडे यांनी लोकनिर्माण विभागाच्या मुख्य अभियंताला पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेला पुरावा समोर करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सात दिवसांत यावर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)