शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मेयोतील निवासी डॉक्टर संपावर :हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:06 IST

एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील निवासी डॉक्टर्सनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा निवासी डॉक्टर्सनी दिला आहे.

ठळक मुद्दे कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील निवासी डॉक्टर्सनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा निवासी डॉक्टर्सनी दिला आहे.राज्य सरकार व रुग्णालय प्रशासन सुरक्षेचे केवळ आश्वासन देत आहे. परंतु, आता संयमाचा अंत झाला आहे. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत संप कायम ठेवला जाईल, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड, महासचिव डॉ. अंचलेश टेकाम, डॉ. गोविंद चंद्रकार व उपाध्यक्ष डॉ. असीमा गर्ग यांनी सांगितले. २००७ मध्ये निवासी डॉक्टर्सवर तलवार उगारण्यात आली होती. त्यावेळी कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध करण्यात आला होता. रुग्णाचे नातेवाईक सतत हल्ले करीत असल्यामुळे डॉक्टर्स असुरक्षित आहेत. मंगळवारच्या घटनेमुळे खुद्द सुरक्षा कर्मचारीही सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतरही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली नाही. मेयोमध्ये ११० सुरक्षा कर्मचाºयांची गरज असताना, केवळ ६८ सुरक्षा कर्मचारी देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर आठ सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे. तसेच, डॉक्टरांच्या कक्षात अलार्म सिस्टिम लावणे व रुग्णांसाठी पास सिस्टिम सुरू करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.असा झाला वादन्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णासोबत केवळ एक किंवा दोन सदस्य आत येऊ शकतात. परंतु, मंगळवारी रात्री एका रुग्णासोबत सात-आठ सदस्य आत येत होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबविले. त्यावरून रुग्णासोबतचा ऑटोचालक शिवीगाळ करायला लागला. त्याने महिला सुरक्षा कर्मचाऱ्याला हातही हावला. त्यामुळे इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली. दुसरीकडे रुग्णाचे नातेवाईक सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप करीत आहेत.आरोग्य व्यवस्था प्रभावितसुमारे २०० निवासी डॉक्टर्स संपावर गेल्यामुळे मेयोतील आरोग्य व्यवस्था प्रभावित झाली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स रुग्णालय सांभाळत आहेत. असे असले तरी निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना सांभाळणे कठीण झाले आहे. सर्वांना संपाचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप