शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मेयो, मेडिकलमध्ये उसनवारीवर औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:35 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधी खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून तीन महिन्यांवर कालावधी झाला आहे, ...

ठळक मुद्देआरोग्य व्यवस्था सलाईनवर : पुरवठादाराकडून औषध पुरवठा बंद

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधी खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून तीन महिन्यांवर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे औषधी खरेदीची जबाबदारी ‘हाफकीन’ कंपनीवर सोपविल्याने पुरवठादाराने औषधे देणे बंद केले आहे. परिणामी, जीवनरक्षक व जीवनापयोगी औषधांचा तुटवडा पडला आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असून, रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून औषध विकत घेण्याची वेळ आली आहे. तर नागपूरच्या मेयो, मेडिकलला उसनवरीवर औषधी घेऊन दिवस काढावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या दोन्ही रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात फार पूर्वीपासून औषधांच्या नावाने ठणठणाट आहे. आता अपघात विभाग व अतिदक्षता विभागातही औषधांचा तुटवडा पडला आहे. जीवनरक्षक औषधांचा जेमतेम साठा असल्याने, दोन्ही रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. तातडीच्या औषधोपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाची (डीएमईआर) ‘आरसी’ ४ आॅगस्ट रोजी संपली. बहुसंख्य रुग्णालयांकडून ‘आरसी’ नूतनीकरणाचे पत्र व स्मरणपत्रही गेले. ‘लोकमत’नेही महिनाभरापूर्वी ‘राज्यातील मेडिकल गोरखपूरच्या मार्गावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी ‘आरसी’ला मुदतवाढ देण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. तर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सचिवांनी तत्काळ मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता याला महिना होत असतानाही ‘आरसी’ची मुदतवाढ किंवा नूतनीकरण झाली नसल्याने सर्वच शासकीय रुग्णालये अडचणीत आली आहेत.औषध पुरवठा ठप्पशासनाने १५ आॅगस्ट २०१७ पासून औषधी खरेदीची जबाबदारी ‘हाफकीन’ कंपनीवर सोपविली, तसे अध्यादेशही काढले. परंतु या कंपनीकडून अद्यापही औषधी खरेदी झालेली नाही. दुसरीकडे या निर्णयाने औषधांची देयके मंजूर होणार नाही, या विचारातून पुरवठादाराने औषधी देणेच बंद केले. यामुळे औषधांची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.मेयोला उसनवारीवर ५०० सलाईन‘आरसी’ संपल्यानंतर मेडिकलने सलाईनचे विशेष नियोजन करून ठेवले होते. यामुळे सलाईनचा तुटवडा नसला तरी जीवरक्षक औषधे-प्रतिजैविकांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. मेयोत यापेक्षाही कठीण स्थिती आहे. सलाईनचा साठा संपल्याने मेडिकलकडून मेयोने पाचशेवर सलाईन उसनवारी घेतल्या. यवतमाळ मेडिकलनेही नागपूर मेडिकलला सलाईनची मागणी केली असल्याची माहिती आहे. मेयो, मेडिकलच्या औषध तुटवड्यावर अधिकाºयांशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल.-संजय देशमुख, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग